Pune Porsche Crash: पोर्शे अपघात प्रकरणी आरोपी मुलाच्या आई वडिलांसह इतर आरोपींना कोर्टाचा दिलासा नाहीच; जामीन फेटाळला
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Porsche Crash: पोर्शे अपघात प्रकरणी आरोपी मुलाच्या आई वडिलांसह इतर आरोपींना कोर्टाचा दिलासा नाहीच; जामीन फेटाळला

Pune Porsche Crash: पोर्शे अपघात प्रकरणी आरोपी मुलाच्या आई वडिलांसह इतर आरोपींना कोर्टाचा दिलासा नाहीच; जामीन फेटाळला

Aug 23, 2024 06:14 AM IST

Pune Porshe Case : कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरणी अल्पवयीन ड्रायव्हरच्या आई-वडिलांसह सहा जणांचा जामीन अर्ज स्थानिक न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावला.

पोर्शे अपघात प्रकरणी आरोपी मुलाच्या आई वडिलांसह इतर आरोपींना कोर्टाचा दिलासा नाहीच; जामीन फेटाळला
पोर्शे अपघात प्रकरणी आरोपी मुलाच्या आई वडिलांसह इतर आरोपींना कोर्टाचा दिलासा नाहीच; जामीन फेटाळला

Pune Porshe Case : कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरणी अल्पवयीन ड्रायव्हरच्या आई-वडिलांसह सहा जणांचा जामीन अर्ज स्थानिक न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश यू. एम. मुधोळकर यांनी १७ वर्षीय मुलीचे आई-वडील, ससून सामान्य रुग्णालयातील निलंबित डॉक्टर अजय तावरे आणि श्रीहरी हलनोर आणि कथित दलाल अश्पाक माकंदर आणि अमर गायकवाड यांना जामीन अर्ज फेटाळला.

कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाची वैद्यकीय तपासणी करण्यापूर्वी त्याच्या रक्ताचे नमुने बदलून पुरावा नष्ट केल्याप्रकरणात आरोपी मुलाचे वडील व बांधकाम व्यावसायिक विशाल सुरेंद्रकुमार अगरवाल, आई शिवानी विशाल अगरवाल ससूनच्या न्यायवैद्यक विभागाचा प्रमुख डॉ. अजय तावरे, आपत्कालीन विभागाचा मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर, अश्पाक मकानदार आणि अमर गायकवाड यांना अटक करण्यात आली आहे. ते सध्या येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांनी जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यांच्या अर्जावर कोर्टात गुरुवारी सुनावणी झाली. मात्र, सर्व सर्व आरोपींचे जामीन अर्ज विशेष न्यायाधीश यू. एम. मुधोळकर यांनी गुरुवारी फेटाळले.

काय झालं कोर्टात ?

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी आरोपपत्र दाखल झाले असून अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींनी जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जाला विरोध करण्यात आला. आरोपींनी हा गुन्हा घडल्याच्या पहिल्याच दिवशी कागदपत्रांसह पुराव्यामध्ये छेडछाड करून खोटे पुरावे तयार करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी थेट कायद्याची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. हे गंभीर प्रकरण आहे. असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी केला होता. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत आरोपींचा जामीन फेटाळला.

१९ मे रोजी पहाटे बिल्डर विशाल अगरवालच्या अल्पवयीन मुलाने भरधाव व दारूच्या नशेत अलिशाल पोर्शे कार चालवत रस्त्याने दुचाकीवरून जात असलेल्या तरुण आणि तरुणीला चिरडले होते. यात दोघांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, अपघाताच्या वेळी आरोपी मद्यधुंद नव्हता हे सिद्ध करण्यासाठी त्याच्या आई-वडिलांनी आणि इतरांनी त्याच्या रक्ताचे नमुने बदलण्याचा कट रचला. या आरोपींना जामीन मिळाल्यास आरोपी साक्षीदारांवर दबाव आणू शकतात आणि पुराव्यांशी छेडछाड करू शकतात, असा युक्तिवाद सरकारी पक्षाने केला.वरिष्ठ सरकारी वकील शिशिर हिरे म्हणाले की, आरोपींनी पुराव्यांशी छेडछाड करून न्यायव्यवस्थेशी खेळ केला, त्यामुळे आरोपीचा जामीन अर्ज फेटाळ्यात यावा अशी मागणी त्यांनी केली. हर्षद निंबाळकर, सुधीर शहा, ऋषिकेश गानू, प्रशांत पाटील, प्रसाद कुलकर्णी, शिवम निंबाळकर अशी आरोपींची बाजू आहे. तर तपास अधिकारी एसीपी गणेश इंगळे यांनी विजय मल्ल्या आणि नीरव मोदी यांचा दाखला देत आरोपी फरार होण्याची शक्यता वर्तवत ते साक्षीदारांना धमकावू शकतात यामुळे त्यांनी चिंता व्यक्त केली.

कोर्टाने जारी केलेल्या ४५ पानांच्या आदेशात म्हटले आहे की, कायद्याच्या विरोधात (सीसीएल) मुलाचे पालक प्रभावशाली व्यक्ती आहेत आणि जामीन मिळाल्यास आरोपी साक्षीदारांना धमकावू शकतात व त्यात ते बदल करू शकतात, त्यामुळे हा युक्तिवाद ग्राह्य धरत त्यांनी आरोपीचा जामीन अर्ज फेटाळून लावला.

कार परत मिळवण्यासाठी अर्ज

अपघात ग्रस्त पोर्शे कार परत मिळवण्यासाठी अगरवाल कुटुंबीयांनी येथील बाल न्याय मंडळात (जेजेबी) अर्ज केला आहे. या अर्जावर २८ ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी होणार आहे. फरार असलेले कामगार कंत्राटदार अरुणकुमार सिंह यांनी गुरुवारी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. रक्ताचे नमुने अदलाबदल केल्याप्रकरणी गुन्हे शाखेने १७ वर्षीय ड्रायव्हरसोबत असलेल्या दोन अल्पवयीन मुलांपैकी एकाच्या वडिलांसह दोघांना अटक केली असली तरी सिंह हा फरार आहे.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर