Sasoon Doctors Dr Ajay Taware and Shrihari Harnor suspended : पुणे कल्याणी नगर अपघात प्रकरणी आरोपी अल्पवयीन मुलांच्या रक्ताचे नमुने बदलल्या प्रकरणी चौकशी समितीने शासनाला अहवाल सादर केला असून या प्रकरणी डॉ. अजय तावरे, डॉ. हळनोर यांच्यासह शिपायाला निलंबित करण्यात आले आहे.
डॉ. तावरे हे ससूनच्या फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख आहेत तर डॉ. हळनोरहे या विभागात कार्यरत आहे. आरोपी मुलाचे वडील विशाल अगरवाल यांनी २० मे रोजी डॉ. तावरे यांच्याशी १४ वेळा संपर्क साधून त्यांना रक्ताचे नमुने बदलण्यास सांगितले होते. त्यानंतर आरोपी मुलाचे रक्ताचे नमुने हे कचऱ्यात फेकून देण्यात आले होते. पुणे पोलिसांनी आरोपी मुलाच्या रक्ताचे नमुने हे औंध रुग्णालयात देखील पाठवले होते. या मुळे दोन्ही डॉक्टरचे बिंग फुटले. सध्या तिघांनाही पुणे पोलिसांनी अटक केली असून त्यांना ३१ मे पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
पुण्याच्या कल्याणीनगरमधील पोर्शे कार अपघात प्रकरणात ससूनच्या दोन वरिष्ठ डॉक्टरांना सोमवारी अटक करण्यात झाली. या प्रकरणी जे. जे. रुग्णालयाच्या डीन पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती देखील गठीत करण्यात आली होती. या समितीने या प्रकरणी ४८ तासात चौकशी पूर्ण केली असून ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणी शासनाला अहवाल दिला आहे.
कल्याणी नगर येथील पोर्श कार अपघातप्रकरणी ससून सामान्य रुग्णालयातील फॉरेन्सिक मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे यांना बिल्डर बापाने अल्पवयीन मुलाच्या सॅम्पल बदलण्यासाठी पैसे दिल्याचे उघड झाले आहे. त्या दिवशी सुमारे दोन तासांत १४ वेळा फोन केला. यानंतर डॉ. तावरे यांच्या सांगण्यानुसार रक्ताचे नमुने बदलण्यात आले. रक्ताचे नमुने हे कचऱ्याच्या डब्यात फेकून देण्यात आले. त्याच्या जागी, दुसऱ्या व्यक्तीच्या रक्ताचे नमुणे तपासणीसाठी पाठविण्यात आले. पोलिसांनी रुग्णालयाच्या फॉरेन्सिक मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉ. तावरे तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हलनोर आणि शिपाई अतुल घाटकांबळे यांच्या घराची मंगळवारी झडती घेतली. त्यांच्याकडून डॉ हलनोर यांच्याकडून अडीच लाख रुपये आणि घाटकांबळे यांच्याकडून ५० हजार रुपये रोख जप्त करण्यात आले.
दरम्यान या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सरकारनं एक विशेष तपास पथक नियुक्त केले होते. या समितीने दिलेल्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अहवालात संबंधित अधिकाऱ्यांनी गंभीर स्वरूपाचे कृत्य केल्याच नमूद केली आहे. डॉक्टर आणि शिपाई यांनी गंभीर स्वरूपाचे केलेलं कृत्य केल्याने त्यांच्यावर निलंनाची कारवाई करण्यात आली आहे.
या बाबत पल्लवी साळवे म्हणाल्या, ससून रुग्णालय, पुणे प्रकरणातील चौकशी समितीचा अहवाल तयार करण्यात येत आहे. तो पूर्ण झाल्यानंतर शासनास सादर करण्यात येईल. सदरील चौकशी ही महाराष्ट्र नागरी संहिता शिस्त व अपील १९७९ कायद्यान्वये करण्यात आलेली आहे. शासकीय नियमानुसार सदर अहवालातील माहिती गोपनीय असल्याकारणाने समिती सदस्य यांना ती कुठेच उघड करता येणार नाही.