Pune Porsche Car Accident : पोर्श कार अपघात प्रकरणातील आरोपीच्या वडिलांना जामीन मंजूर; पण मुक्काम मात्र कोठडीतच
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Porsche Car Accident : पोर्श कार अपघात प्रकरणातील आरोपीच्या वडिलांना जामीन मंजूर; पण मुक्काम मात्र कोठडीतच

Pune Porsche Car Accident : पोर्श कार अपघात प्रकरणातील आरोपीच्या वडिलांना जामीन मंजूर; पण मुक्काम मात्र कोठडीतच

Jun 22, 2024 06:32 AM IST

Porsche Car Accident : पुण्यातील कल्याणी नगर येथील पोर्शे कार दुर्घटनेत कोर्टाने अल्पवयीन आरोपीच्या वडिलांना जामीन मंजूर केला आहे. मात्र, जामीन मिळाल्यानंतरही वडिलांचा मुक्काम हा कोठडीतच राहणार आहे.

पोर्श कार अपघात प्रकरणातील आरोपीच्या वडिलांना जामीन मंजूर; पण मुक्काम मात्र कोठडीतच
पोर्श कार अपघात प्रकरणातील आरोपीच्या वडिलांना जामीन मंजूर; पण मुक्काम मात्र कोठडीतच

Porsche Car Accident : पुण्यात गेल्या महिन्यात १९ मे रोजी कल्याणीनगर येथे पुण्यातील बडा बांधकाम व्यावसाईक विशाल अगरवाल याच्या अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत आलीशान पोर्शे कार चालवत दोन मुलांना चिरडल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. या अपघातानंतर राज्यात संतप्त पडसाद उमटले होते. यानंतर आरोपी मुलाची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली होती. तर आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यात फेरफार केल्याबद्दल तसेच चालकाला धमकावल्या बद्दल बिल्डर विशाल अगरवाल व पत्नीला अटक करण्यात आली होती. आता या अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या वडिलांना न्यायालयाने शुक्रवारी १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केला.

अग्रवालसह कोझी' चे मालक व 'ब्लॅक' चां असिस्टंट मॅनेजर, व्यवस्थापक, कर्मचाऱ्यांनाही जामीन मिळाला आहे. मात्र चालकाला धमकावणे, तसेच अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या नमुन्यात फेरफार करून पुरावा नष्ट करणे या गुन्ह्यांमध्ये विशाल अगरवालची न्यायालयीन कोठडी कायम असल्याने त्याचा मुक्काम येरवडा कारागृहातच राहणार आहे.

पुणे पोर्शे अपघात प्रकरणी अनेक धक्कादायक माहीती पुढे येत आहे. अपघात झाल्यावर आरोपीच्या वडील विशाल अगरवाल यांनी मुलाचे रक्ताचे नमुने बदलले. यानंतर मुलावर आरोप येऊ नये यासाठी ड्रायव्हरला हे प्रकरण स्वत:वर घेण्यासाठी त्याला धमकावण्यात आले होते. या प्रकरणी पोलिसांनी विशाल अगरवाल व त्याच्या पत्नीला व आरोपीच्या आजोबाला अटक केली होती. आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यामध्ये फेरफार केल्याप्रकरणी ससून रुग्णालयाच्या दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली होती. दरम्यान, या सर्व प्रकऱणाचा अद्याप तपास सुरू आहे.

पोर्श कार अपघात प्रकरणात पोलिसांनी या मुलाच्या आईलाही अटक केलं होतं. तसेच आरोपीच्या आजोबालाही अटक केलं होतं. त्यामुळे या अपघात प्रकरणानंतर एकाच कुटुंबातील चौघजणांना पोलिसांनी अटक केली होती. शुक्रवारी या प्रकरणी कोर्टात सुनावणी झाली. या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या वडिलांना दाखल तीन गुन्ह्यापैकी एका गुन्ह्यात जामीन मिळाला आहे. तर इतर दोन गुन्हे दाखल असल्यामुळे त्यांचा मुक्काम कोठडीतच राहणार आहेत. मुलगा अल्पवयीन असल्याचे माहिती असतानाही त्याला गाडी दिल्या प्रकरणातील दाखल गुन्ह्यात हा जामीन मिळाला आहे.

कोसी पबचे मालक नमन भुतडा, मॅनेजर सचिन काटकर, ब्लॅक पबचे सहाय्यक व्यवस्थापक संदीप सांगळे यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनाही न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. काऊंटर मॅनेजर जयेश गावकर, कामगार नितेश शेवाणी. पुणे शहर पोलिसांनी मोटार वाहन कायद्याच्या कलम ३,५,१९१ (अ) आणि किशोर न्याय कायद्याच्या कलम ७५, ७७ अन्वये त्यांना अटक करण्यात आली होती.

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आरोपींना जामीन मंजूर करण्यात आला, अशी अशी माहिती विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी दिली. पुणे सत्र न्यायालयाने दहा दिवसांपूर्वी युक्तिवाद ऐकून शुक्रवारी जामीन मंजूर केला.

आरोपीच्या वडिलांचे वकील प्रशांत पाटील म्हणाले, 'माझ्या क्लायंटला पुण्यातील सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने घातलेल्या अटींचे पालन करणे हे त्यांचे कर्तव्य आहे आणि ते तपास यंत्रणेला सहकार्य करत राहतील.

घटना काय घडली होती?

एका बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत ताशी १६० किमीच्या वेगाने आलीशान पोर्श कार चालवत अनिश अवधिया व अश्विनी कोस्टा यांना धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. अनिश अवधिया हा २४ वर्षांचा तरुण इंजिनिअरिंग होता. तर आयटी क्षेत्रात काम करणारी अश्विनी कोस्टा ही त्याची मैत्रीण होती. दोघेही एकाच कंपनीत काम करत होते. मित्रांसह ते डिनरला गेले होते. हे दोघे बाईकवरुन घरी जात असतांना भरधाव पोर्शेने या दोघांना धडक दिली. यात दोघांचा मृत्यू झाला होता.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर