मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune porsche car case : पुणे पोर्श कार अपघातातील आरोपीच्या आईला अटक, मुलाला वाचवण्यासाठी बदलले होते रक्ताचे नमुने

Pune porsche car case : पुणे पोर्श कार अपघातातील आरोपीच्या आईला अटक, मुलाला वाचवण्यासाठी बदलले होते रक्ताचे नमुने

Jun 01, 2024 10:15 AM IST

Pune porsche car case : पुणे पोर्श कार अपघातातील अल्पवयीन आरोपीच्या आईला अटक करण्यात आली आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ही माहिती दिली.

पुणे पोर्श कार अपघातातील आरोपीच्या आईला अटक, मुलाला वाचवण्यासाठी केला होता आटापिटा
पुणे पोर्श कार अपघातातील आरोपीच्या आईला अटक, मुलाला वाचवण्यासाठी केला होता आटापिटा

shivani agarwal arrest : राज्यासह देशभरात चर्चेत असलेल्या पुण्यातील पोर्श क्रॅश प्रकरणातील १७ वर्षीय आरोपीची आई शिवानी अगरवाल हिला पोलिसांनी अटक केली आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आज ही माहिती दिली. शिवानी अग्रवाल हिनं आपल्या मुलाला वाचवण्यासाठी अनेक क्लृप्त्या केल्या होत्या.

ट्रेंडिंग न्यूज

पुण्यातील कल्याणीनगर भागात काही दिवसांपू्र्वी आलिशान पोर्श कारनं एका बाइकला धडक दिली होती. त्यात दोन जणांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये एक मुलगा आणि एका मुलीचा समावेश होता. बाइकला धडक देणारा पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर विशाल अगरवाल याचा मुलगा आहे. हा अपघात झाल्यानंतर त्या मुलाला वाचवण्यासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न झाले. त्यात ससूनच्या डॉक्टरांचाही सहभाग होता. चौकशीनंतर दोन डॉक्टरांना निलंबित करण्यात आलं. आरोपीच्या वडिलांना अटक करण्यात आली होती. आता आईलाही अटक करण्यात आली आहे.

अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी रक्ताचे नमुने बदलण्यात आले होते. यात शिवानी अगरवाल हिचा सहभाग होता. तिनं पैशाचं आमिष दाखवून स्वतःच्या रक्ताचे नमुने हॉस्पिटलमध्ये दिले होते. ही माहिती समोर आल्यानंतर शिवानी फरार झाली होती. काल, शुक्रवारी रात्री मुंबईहून पुण्यात पोहोचली आणि त्यानंतर तिला अटक करण्यात आली.

राजकीय कनेक्शन

अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलण्याच्या प्रकरणात डॉ. तावरे व डॉ. हलनोर यांना अटक करण्यात आली होती. यातील डॉ. तावरे यांची नियुक्ती आमदार सुनील टिंगरे यांच्या शिफारशीनंतर करण्यात आल्याचा आरोप आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी या नियुक्तीला मान्यता दिली होती. अनेक प्रकरणांमध्ये आरोपी असतानाही त्यांना फॉरेन्सिक मेडिकल विभागाचे प्रमुख करण्यात आले. अल्पवयीन मुलीचे वडील विशाल अगरवाल याचं डॉ. तावरे यांच्याशी व्हॉट्सॲपवर अनेकदा बोलणं झालं होतं.

रक्ताचे नमुने बदलण्यात आल्याचं कसं कळलं?

लॅब चाचणीत रक्ताच्या नमुन्यात अल्कोहोल नसल्याचं आढळून आलं. संशय आल्यानं दुसऱ्या रुग्णालयात तपासणी करण्यात आली. नंतर डीएनए चाचणीत नमुने वेगळं असल्याचं समोर आलं. यानंतर रुग्णालयातच काहीतरी गडबड असल्याचा संशय आला. संपूर्ण कुटुंब त्या अल्पवयीन मुलाला वाचवण्यात गुंतलं होतं. अल्पवयीन मुलाच्या बिल्डर वडिलांवर लाच दिल्याचा आरोप आहे. आरोपीचे आजोबा सुरेंद्र अगरवाल हे फसवणुकीच्या कटात सहभागी होते. अग्रवाल कुटुंबीयांनी त्यांच्या फॅमिली ड्रायव्हरला यात गोवण्याचा प्रयत्न केला होता. त्यासाठी ड्रायव्हरला दोन दिवस ओलीस ठेवलं आणि संपूर्ण कुटुंबानं त्याला आमिष दाखवून धमकावलं. मात्र, पोलिसांना याची माहिती मिळाली.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग