Pune Accident : पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी गु्न्हा दाखल झाल्यानंतर फरार झालेल्या बिल्डर विशाल अग्रवालला अखेर अटक
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Accident : पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी गु्न्हा दाखल झाल्यानंतर फरार झालेल्या बिल्डर विशाल अग्रवालला अखेर अटक

Pune Accident : पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी गु्न्हा दाखल झाल्यानंतर फरार झालेल्या बिल्डर विशाल अग्रवालला अखेर अटक

May 21, 2024 10:21 AM IST

Pune Porsche Car Accident : पुण्यात मद्यधुंद अल्पवयीन मुलाने बेदरकारपणे पोर्शेकार चालवून दोघांचा जीव घेतला होता. या प्रकरणी पोलिसांनी त्याचे वडील व पुण्यातील बडे उद्योजक विशाल अग्रवाल याच्यावर गुन्हा दाखल केला होता. मात्र, गुन्हा दाखल झाल्यावर हा बिल्डर फरार झाला आहे. त्याला अटक करण्यात आली आहे.

पुणे शहरातील कल्याणीनगर परिसरात लक्झरी पोर्श कारने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघाता प्रकरणी आरोपीला न्यायल्यात हजर केले असता त्याला जामीन मिळाला.
पुणे शहरातील कल्याणीनगर परिसरात लक्झरी पोर्श कारने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघाता प्रकरणी आरोपीला न्यायल्यात हजर केले असता त्याला जामीन मिळाला.

Pune Builder Vishal Agarwal Arrested: कल्याणीनगर परिसरात पोर्शे कारने दोघांना चिरडणाऱ्या वेदांत अग्रवालचे वडील तसेच पुण्यातील बडे बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल हे गुन्हा दाखल झाल्यावर फरार झाले होते. त्यांना अटक करण्यासाठी पुणे पोलिसांनी पथके रवाना केली होती. अखेर त्यांना संभाजीनगर येथून अटक करण्यात आली आहे. आज पहाटे छत्रपती संभाजीनगरमधून विशाल अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे.  विशाल अग्रवाल यांना आज  दुपारपर्यंत पुण्यात आणण्यात येणार आहे. यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. दरम्यान, न्यायालय त्यांच्याबाबत काय निकाल देणार या कडे सर्वांचे लक्ष लागून आहे.  

गुन्हा दाखल झाल्यानंतर झाले होते फरार 

 पुण्यात मद्यधुंद अल्पवयीन मुलाने बेदरकारपणे पोर्शे कार चालवून दोघांचा जीव घेतला होता. या प्रकरणी पोलिसांनी त्याचे वडील व पुण्यातील बडे उद्योजक विशाल अग्रवाल याच्यावर गुन्हा दाखल केला होता. मात्र, गुन्हा दाखल झाल्यावर हा बिल्डर फरार झाला आहे. विशाल अग्रवाल हा पुण्यातील ब्रम्हा कॉर्प या बांधकाम उद्योग समूहाचा प्रमुख आहे. दरम्यान, पोलिस त्याचा शोध घेत होते.  अग्रवाल यांना अटक करण्यासाठी पथके रवाना करण्यात आली होती. 

Maharashtra Weather Update: मुंबई, ठाणे, पालघरमध्ये उष्णतेची लाट! हवामान विभागाने दिला 'हा' इशारा, राज्यात पावसाचा इशारा

पुण्यात शनिवारी विशाल अग्रवाल यांचा मुलगा वेदांत अग्रवाल याने दारू पिऊन बेदरकारपणे आलीशान गाडी चालवत समोरील दुचकीवरील दोघांना उडवले होते. यात दोघांचाही मृत्यू झाला होता. या प्रकरणी नागरिकांनी त्याला पकडून चोप देऊन त्याला पोलिसांच्या हवाली केले होते. मात्र, बड्या बिल्डरचा हा मुलगा असल्याने त्याला वाचवण्यासाठी मोठी यंत्रणा लागल्याचा आरोप करण्यात आला. त्याला काही वेळातच जामीन देखील मंजूर करण्यात आला. दरम्यान, या प्रकरणी मोठ्या प्रमाणात बिल्डर विरोधात आणि पोलिसांच्या संशयी भूमिकेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागल्याने पुणे पोलिसांनी बिल्डर विशाल अग्रवाल यांच्यावर देखील गुन्हा दाखल केला आहे. आपला मुलगा हा अल्पवयीन असूनही त्याला पोर्शे कार चालवायला दिली आणि मोटर वाहन अधिनियमाच्या कलम ३ , ५ आणि १९९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तर मुलगा दारू पितो हे ठाऊक असूनही त्याला पार्टी करण्यास परवानगी दिल्याबद्दल देखील विशाल अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणी गुन्हा दाखल झालीवर विशाल अग्रवाल हे फरार झाले आहेत. त्यांचा फोन देखील बंद आहे. त्यांच्या शोध घेण्यासाठी पोलिसांची विविध पथके रवाना करण्यात आली आहेत.

Jayant patil : “लढाई संपलेली नाही, तर आता..’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावनिक पत्र

पब चालकांवर गुन्हा दाखल

पुण्यातील कल्याणीनगरमध्ये घडलेल्या अपघाताला संबंधित कारचालक मुलाच्या वडीलांना कारणीभूत ठरववत मुलाचे वडील विशाल अग्रवाल तसेच त्याला दारु देणाऱ्या दोन पब चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हॉटेल काझीचे मालक प्रल्हाद भुतडा व मॅनेजर सचिन काटकर त्याचबरोबर हॉटेल ब्लॅकचे संदीप सांगळे आणि बार काऊंटर जयेश बोनकरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोषींवर कठोर कारवाई करा : देवेंद्र फडणवीस

पोलिसांकडून विशाल अग्रवाल यांच्या मुलाला विशेष वागणूक देण्यात आल्याचा आरोप करण्यात आल्याचा आरोप झाल्यावर या प्रकरणाची गंभीर दाखल गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. या प्रकरणात आरोपीला कोणती विशेष वागणूक दिली असल्यास, त्यावेळचे पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही तपासून संबंधितांवर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले आहे.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर