Pune Porsche accident: पुणे हीट अँड रन प्रकरणी मोठी अपडेट! विशाल अग्रवालच्या वडिलांचे छोटा राजनशी संबंध
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Porsche accident: पुणे हीट अँड रन प्रकरणी मोठी अपडेट! विशाल अग्रवालच्या वडिलांचे छोटा राजनशी संबंध

Pune Porsche accident: पुणे हीट अँड रन प्रकरणी मोठी अपडेट! विशाल अग्रवालच्या वडिलांचे छोटा राजनशी संबंध

May 22, 2024 07:22 AM IST

Pune Accident : पुणे हीट अँड रन प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. आरोपी मुलाच्या वडिलांना मंगळवारी अटक करण्यात आली. या प्रकरणाचा तपास वेगात सुरू असून आरोपीचे वडील विशाल अगरवालच्या वडिलांचा छोटा राजनशी संबंध असल्याचे पुढे आले आहे.

विशाल अगरवालच्या वाडिलांचा छोटा राजनशी संबंध असल्याचे पुढे आले आहे.
विशाल अगरवालच्या वाडिलांचा छोटा राजनशी संबंध असल्याचे पुढे आले आहे.

Pune Porsche Car Accident : पुण्यातील कल्याणी नगर येथे अल्पवयीन मुलाने दारू पिऊन गाडी चालवत दोन तरुणांना दिलेल्या धडकेत दोघांचाही मृत्यू झाला. याप्रकरणी मुलाला जामीन मिळाला असला तरी पुणे पोलिसांनी मंगळवारी आरोपी मुलाचे वडील विशाल अगरवाल याला संभाजी नगर येथून अटक केली. दरम्यान, या प्रकरणी आणखी काही जणांना अटक करण्यात अलायी आहे. या प्रकरणाचा तपास पुणे पोलिस करत असतांना आणखी एक धक्कादायक माहिती पुढे आली आहे. आरोपीचे वडील विशाल अगरवालचे वडील सुरेन्द्र अगरवाल ह्यांचे अंडरवर्ल्डसोबत संबध असल्याचे पुढे आले आहे. अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनशी संबंध असल्याची माहिती आहे.

Maharashtra Weather Update : राज्यात तापमान वाढणार! पालघर, ठाणे, मुंबईसह 'या' जिल्ह्यात हीट वेव्ह; आयएमडीचा यलो अलर्ट

भावाशी होता संपत्तीचा वाद

पुणे हीट अँड रन प्रकरणी अटक करण्यात आलेल्या विशाल अगरवाल ह्याला आज कोर्टापुढे हजर केले जाणार आहे. दरम्यान, भावांसोबत असलेल्या संपत्तीच्या वादात वेदांत अग्रवालच्या आजोबांनी छोटा राजनची मदत घेतल्याची माहिती आहे. या प्रकरणी अजय भोसले या व्यक्तीच्या हत्येच्या प्रयत्नामध्ये सुरेंद्र कुमार अग्रवाल यांच्याविरोधात बंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याची माहिती पुढे आली आहे.

Boat sank in Bhima : वादळामुळे भीमा नदीत उजनी धरणात बोट उलटली; ६ जण बुडाले, एकाने पोहून वाचवले प्राण

अगरवाल यांच्यावर पुणे पोलिसांचा वरदहस्त

दरम्यान भोसले यांच्या प्रकरणात देखील पुणे पोलिसांनी अगरवाल कुटुंबियांवर वरदहस्त दाखवल्याचे पुढे आले आहे. या प्रकरणात मोक्का लावने गरजेचे असतांना केवळ थातुरमातुर कलमे लावण्यात आली होती. आरोपत्रही दाखल करेपर्यंत सुरेंद्र कुमार अग्रवाल यांना अटक करण्यात आली नव्हती.

नातवाची हमी देणाऱ्या आजोबाचे संबंध गुन्हेगारी जगताशी अल्पवयीन आरोपीला कोर्टात दाखल केले असता, त्याची हमी देण्यासाठी त्याचे आजोबा सुरेन्द्र अगरवाल हे कोर्टात गेले होते. मात्र, सुरेन्द्र अगरवाल यांचे थेट छोटा राजनशी संबंध असल्याचे पुढे आले आहे. २००७-२००८ मध्ये एका प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयात छोटा राजनशी संबंधित सर्व प्रकरणं सीबीआयला सोपवण्यात आली होती. त्यातील काही प्रकरणात सुरेन्द्र अगरवाल यांचे छोटा राजनशी संबंध असल्याचे पुढे आले आहे. सुरेंन्द्र अगरवाल यांनी छोटा राजनचा हस्तक विजय तांबटची बँकॉक येथे भेट घेतली होती. सुरेंन्द्र यांचे भावासाोबत असलेल्या संपत्तीच्या वादात राजनने त्यांची मदत करण्याची मागणी त्यांनी केली होती. यानंतर अजय भोसले या व्यक्तीचा खुनाचा प्रयत्न करण्यात आला होता. या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आले.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर