Porsche Car Accident : विशाल अग्रवालचा जामीनाचा मार्ग मोकळा, कोर्टाने पोलिसांची ‘ती’ मागणी फेटाळली, काय घडलं कोर्टात?
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Porsche Car Accident : विशाल अग्रवालचा जामीनाचा मार्ग मोकळा, कोर्टाने पोलिसांची ‘ती’ मागणी फेटाळली, काय घडलं कोर्टात?

Porsche Car Accident : विशाल अग्रवालचा जामीनाचा मार्ग मोकळा, कोर्टाने पोलिसांची ‘ती’ मागणी फेटाळली, काय घडलं कोर्टात?

May 24, 2024 06:18 PM IST

Pune Porsche Car Accident : पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणी विशाल अग्रवाल यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यामुळे अग्रवाल याच्या जामीनाचा मार्ग आता मोकळा झाल्याचे बोलले जात आहे.

 विशाल अग्रवालला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
 विशाल अग्रवालला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Pune Porsche Car Accident Update :पुण्यातील पोर्शे कार अपघातात मोठी अपडेट समोर आली असूनविशाल अग्रवाल (vishal agarwal) यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी विशाल अग्रवालला पोलीस कोठडी देण्याची मागणी केली होती. मात्र न्यायालयाने पोलिसांची मागणी फेटाळत अग्रवालला १४दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत (judicial custody) पाठवले आहे. न्यायलयीन कोठडी सुनावल्यामुळे आता विशाल अग्रवालच्या जामीनाचा मार्ग मोकळा झाला आहे.

पुण्यातील बिल्डरविशाल अग्रवालच्या अल्पवयीन मुलाने रविवारी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास दारूच्या नशेत अलिशान पोर्शे कार २०० च्या स्पीटने चालवून दोन जणांचा जीव घेतला होता. त्यानंतर पोलिसांनी आरोपीची रवानगी बालसुधार गृहात केली आणि पोलिसांनी विशाल अग्रवालवर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती. आता न्यायालयाने विशाल अग्रवालला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी विशाल अग्रवालला पोलीस कोठडीत पाठवण्याची मागणी केली होती.

या प्रकरणातील विशाल अग्रवालसोबत सर्वच ६ आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानंतर आता विशाल अग्रवाल उच्च न्यायालयात जाऊ शकतो किंवा जामीनासाठी अर्ज करू शकतो. विशाल अग्रवाल आज किंवा उद्या जामीनासाठी अर्ज करण्याची शक्यता आहे.

सरकारी वकिलांचा युक्तीवाद -

आजच्या सुनावणीत सरकारी वकील विद्या विभुते यांनी युक्तीवाद केला की, वाहनाची नोंदणी केली नाही. ६ आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्याच्या घरा समोरील रजिस्टर ताब्यात घेतले आहे. आरोपी मुलाने ४७ हजाराचे दारुचे बिल भरले. त्याच्या बँक खात्याची तपासणी गरजेचे आहे. गाडी बर्म्हा लिमिटेड कंपनीच्या नावावर आहे. सीसीटीव्हीत फेरफार केल्याचे आढळले आहे. पोर्शे गाडीचा चालक पोलिसांच्या ताब्यात आहे. जे अन्य आरोपी आहेत. त्यात हॉटेलमधील कुणी मुलाला आत घेतले, कुणी दारू दिली त्याचा तपास व्हायचा आहे. आरोपी हा ब्लॅक पबमध्ये होता त्या वेळी आणखी कोण कोण होते, याचा तपास होणे गरजेचे आहे. या सोबतच आरोपी मुलांसोबत जी मुले होती त्यांनी दारूसोबत आणखी काही अमली पदार्थाचे सेवन केले होते का, याचा देखील तपास होणे गरजेचे आहे. त्यामुळे ७ दिवसांची पोलीस कोठडी मिळणे गरजेची आहे.

पोलिस तपास अधिकारी म्हणाले की, पुरावा नष्ट करण्याचा हेतू असू शकतो. ड्रायव्हरची रिमांड आज मिळाली असून त्याच्या चौकशी आणखी माहिती मिळाली.

बचाव पक्षाच्या वकिलाचा युक्तीवाद -

आरोपीचे वकील शहा यांनी कोर्टात युक्तीवाद करताना म्हटले की, आरोपीची कस्टडी वाढवण्यासाठी पोलिसांनी लावलेली कलमे पुरेशी नाही. आमच्या कॉलम आठ मध्ये नमूद केलेल्या डीव्हीआर पोलिसांकडे आहे. अल्पवयीन आरोपीला पैसे कुठून मिळाले हे आम्ही सांगू शकत नाही, हे पोलिसांचे काम केले आहे. त्यांनी ते लगेच करणे अपेक्षित होते. मात्र त्यांनी ते का केले नाही, हे माहिती नाही.

मुलाच्या तपासासाठी वडिलांच्या कोठडीची काय गरज आहे. मुलासोबत कोण होते हा तपास करण्यासाठी मुलाच्या वडिलांची कोठडी गरजेची नाही. माझी कोर्टाला विनंती आहे की माझ्या अशिलावर कोणतीही अशी केस होत नाही.

 

आरटीओचे १७५८ रुपये दिले नाही म्हणून फसवणुकीचे ४२० कलम लावणे चुकीचे आहे. आतापर्यंत आरटीओ अधिकारी काय करत होते. आरोपीचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. सायबर एक्स्पर्ट कडून त्याचा तपास करणे गरजेचे आहे. आरोपीने बार्म्हा कंपनीच्या नावाने घेतली असून ही गाडी आळंदी येथे नोंदणी केली नाही. आरोपीच्या घररारील सीसीटीव्ही डिव्हीआर जप्त करण्यात आला आहे. गंगाराम हा गाडीचा चालक गाडीत होता. विशाल अग्रवालला वकील -१९९ए कायद्यानुसार मुलाने गुन्हा केला नसेल तर मुलाच्या वडिलांना जबाबदार धरता येणार नाही.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर