पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. तपासात दिरंगाई केल्याच्या ठपका ठेवत येरवडा पोलीस ठाण्यातील दोन पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. ड्रंक-ड्राईव्ह प्रकरणाच्या चौकशीसाठी पुणे पोलिसांनी एक अंतर्गत कमिटी गठित केली होती. या समितीच्या अहवालानंतर हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे आणि सह्याक पोलीस निरीक्षक विश्वनाथ तोडकरी अशी निलंबित करण्यात आलेल्या दोन अधिकाऱ्यांची नावे आहेत.
अपघातानंतर तपासात दिरंगाई आणि अपघाताची माहिती वेळेत वरिष्ठांना दिली नसल्याचा ठपका ठेवत दोघांचे निलंबन करण्यात आले आहे.
पोर्शे कार अपघातानंतर तपासात दिरंगाई केल्याचा आरोप पोलिसांवर केला जात होता. आरोपीला काही तासातच जामीन मिळाल्यानंतर समाजात संतापाची लाट निर्माण झाली. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनीही पुणे आयुक्तालयात बैठक घेऊन पोलिसांना सुचना दिल्या. पोलिसांनी याबाबत एक समिती गठित केली होती. त्या समितीच्या अहवालानंतर आता पोलिस आयुक्तांनी या प्रकरणात दिरंगाई करणे तसेच वरिष्ठांना सूचना न दिल्याच्या आरोपात दोन अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे.
पुणे पोलीस आयुक्तांनी निलंबित केलेले राहुल जगदाळे आणि विश्वनाथ तोडकरी हे येरवडा पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. अपघात झाला त्या रात्री हे दोघे त्या ठिकाणी ड्युटीवर तैनात होते. अपघात झाल्यानंतर त्यांनी कंट्रोल रूमशी संपर्क केला नाही, तसेच नाईट राऊंडवर असलेल्या पोलीस उपायुक्तांनाही याची माहिती दिली नाही. त्यामुळे या दोघांचा हेतू नेमका काय होता, त्यांनी ही माहिती का लपवून ठेवली याचीही चौकशी करण्यात येणार आहे.
पुण्यातील पोर्शे कार अपघातात मोठी अपडेट समोर आली असून विशाल अग्रवाल (vishal agarwal) यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी विशाल अग्रवालला पोलीस कोठडी देण्याची मागणी केली होती. मात्र न्यायालयाने पोलिसांची मागणी फेटाळत अग्रवालला १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत (judicial custody) पाठवले आहे. न्यायलयीन कोठडी सुनावल्यामुळे आता विशाल अग्रवालच्या जामीनाचा मार्ग मोकळा झाला आहे.
पुण्यातील बिल्डर विशाल अग्रवालच्या अल्पवयीन मुलाने रविवारी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास दारूच्या नशेत अलिशान पोर्शे कार २०० च्या स्पीटने चालवून दोन जणांचा जीव घेतला होता.
संबंधित बातम्या