मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Porsche Accident: माझा बाप बिल्डर असता तर ? माझी आवडती कार; कल्याणी नगर येथे अपघातस्थळी रंगली अनोखी निबंध स्पर्धा

Pune Porsche Accident: माझा बाप बिल्डर असता तर ? माझी आवडती कार; कल्याणी नगर येथे अपघातस्थळी रंगली अनोखी निबंध स्पर्धा

May 26, 2024 01:05 PM IST

Pune Porsche car accident essay writing competition : पुण्यात कल्याणी नगर येथे झालेल्या कार अपघातातील आरोपीला निबंध लिहून जामिनावर सोडण्यात आले होते. आज अपघात झालेल्या जागेवर अनोखी निबंध स्पर्धा घेण्यात आली.

पुण्यात कल्याणी नगर येथे झालेल्या कार अपघातातील आरोपीला निबंध लिहून जामिनावर सोडण्यात आले होते. आज अपघात झालेल्या जागेवर अनोखी निबंध स्पर्धा घेण्यात आली.
पुण्यात कल्याणी नगर येथे झालेल्या कार अपघातातील आरोपीला निबंध लिहून जामिनावर सोडण्यात आले होते. आज अपघात झालेल्या जागेवर अनोखी निबंध स्पर्धा घेण्यात आली.

Pune Porsche car accident essay writing competition : पुण्यात गेल्या रविवारी एका अल्पवयीन मद्यधुंद बिल्डर पुत्राने भरधाव पोर्शे कार चालवून दोघांना उडवले होते. या अपघातात एका तरुणाचा आणि एका तरुणीचा मृत्यू झाला होता. दरम्यान, आरोपी बिल्डर पुत्राला बाल न्यायालयाने अपघातावर निबंध आणि १५ दिवस आरटीओमध्ये काम करण्यास सांगून जामीन दिला होता. या घटनेमुळे पुण्यात आणि देशात संतापाची लाट उसळली होती. दरम्यान, आज या घटनेचा निषेध करण्यासाठी अपघात झाला त्या ठिकाणी पुणे युवक काँग्रेसने अनोखी स्पर्धा आयोजित केली. या ठिकाबी राज्यस्तरीय निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेचे विषय देखील खास आहे. ज्याची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या स्पर्धेत पहिल्या येणाऱ्याला ११ हजार १११ रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. आज सकाळी ९ वाजता पासून कल्याणीनगर परिसरात बॉलर पबसमोर ही निबंध स्पर्धा सुरू आहे. आमदार रवींद्र धंगेकर यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस दिले जाणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Pune News:पुणे पालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्याचा लेटर बॉम्ब! मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीत आरोग्य मंत्र्याची तक्रार; म्हणाले..

पुण्यात कल्याणीनगरमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी बिल्डरच्या अल्पवयीन मुलाला निबंध लिहिण्याच्या आणि आरटीओसोबत वाहतूक नियंत्रण करण्याच्या अटीवर जामीन मंजूर केला गेला. याचा निषेध करण्यासाठी काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी या स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत माझा बाप बिल्डर असता तर…, अश्विनी आणि अनिशचे मारेकरी कोण?, माझी आवडती कार ( पॉर्शे, फरारी, मर्सिडीज), दारूचे दुष्परिणाम, मी खरंच पोलीस अधिकारी झालो तर? हे विषय देण्यात आले होते.

Fatka Gang : फटका गँगमुळे तरुणाचे आयुष्य उद्ध्वस्त, तीन महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या जगनचे दोन्ही पाय निकामी

या स्पर्धेसाठी ११ हजार १११, ७ हजार ७७७, ५ हजार ५५५५, आणि १ हजार १११ रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. या स्पर्धेत अनेकांनी सहभाग नोंदवला आहे. या स्पर्धेत १७ वर्षे ८ महिने ते ५८ वर्षे वयोगटाचे नागरिक या स्पर्धेत भाग घेऊ शकतील अशी अनोखी अटदेखील ठेवण्यात आली आहे. या स्पर्धेची पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली होती. तर आज या स्पर्धेला पुणेकरांनी मोठा प्रतिसाद देखील दिला आहे.

Nashik News : नाशिकमध्ये आयकर विभागाची मोठी रेड! तब्बल ५०० कोटींचे घबाड लागले हाती; पैसे मोजून अधिकारीही थकले

स्पर्धेच्या ठिकाणी चोख बंदोबस्त

कल्याणी नगर येथील बॉलर पब पुढे ही स्पर्धा सकाळी ९ ते १ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आली आहे. या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तब्बल ६० ते ७० पोलिस या ठिकाणी गैर प्रकार टाळण्यासाठी तैनात करण्यात आले होते. ही स्पर्धा शांततेत पार पडली आहे.

नागरिकांच्या संतापानंतर आरोपीची बालसुधार गृहात रवानगी

पोर्शे कार अपघातातील आरोपीला बाल हक्क न्यायालयाने जामीन मंजूर केला. त्याला ३०० शब्दात अपघात विषयावर निबंध लिहण्याची अट घातली होती. यावरून बालहक्क न्यायालयासह पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. नागरिकांनी यावर संताप व्यक्त केल्यावर अल्पवयीन मुलाची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.

अपघात प्रकरणी आरोपीच्या आजोबाला देखील अटक

पोर्शे कार अपघात प्रकरणी आतापर्यंत ५ जणांना अटक करण्यात आली असून या प्रकरणी मुलाचे वडील व आजोबा यांना देखील अटक करण्यात आली आहे. अपघातानंतर चालकाला डांबून ठेवल्याचा आणि त्याला गुन्हा स्वत:च्या नावावर घेण्यासाठी आजोबा सुरेन्द्र अगरवाल यांनी दबाव टाकल्याचा आरोप आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग