पुण्यात रविवारी रात्री अडीच वाजता भीषण अपघात झाला. कल्याणीनगर परिसरात एका भरधाव पोर्शे कारने (Pune Porsche Car Accident) दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत एका जोडप्याचा मृत्यू झाला होता. हा अपघात इतका भीषण होता की, भरधाव वेगात असणाऱ्या कारने दिलेल्या धडकेनंतर दुचाकीवरील जोडपे हवेत उडाले आणि दुसऱ्या एका कारवर जाऊन आदळले. या अपघातात दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, कार तब्बल २०० किमी वेगात होती. दरम्यान घटनास्थळावरील एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. यामध्ये कार भरधाव वेगात जाताना दिसत आहे.
हा अपघात पुण्यातील कल्याणी नगर परिसरात रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास झाला होता. एका आलिशान स्पोर्टस कारने दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांना उडवलं होते. धडक इतकी भीषण होती की, दोघे हवेत उडाले आणि दुसऱ्या एका कारवर जाऊन पडले. यानंतर कार रस्त्याच्या शेजारी जाऊन धडकली आणि तिथेच थांबली. यानंतर तिथे उपस्थित नागरिकांनी चालकाला चांगलाच चोप दिला. ही कार एका बिल्डरचा मुलगा चालवत होता. या अपघाताच्या काही सेकंद आधीचा व्हिडिओ समोर आला आहे.
या अपघातातील आरोपी कारचालक आणि त्याच्या पालकाविरोधात नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या दोघांविरोधात कारवाईची मागणी केली जात आहे. काही तासांपूर्वी अपघाताला कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलाचा पबमध्ये दारू पितानाचा व्हिडिओही समोर आला आहे. त्यामुळे पबमधून बाहेर पडल्यानंतर भरधाव वेगाने जाताना त्याने दोघांना उडवले. या घटनेचा दुसरा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे.
पुण्यातील पोर्शे कारच्या भयानक अपघाताचंदुसरं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. या व्हिडिओमध्ये कार भरधाव वेगाने जाताना दिसत आहे. अपघात स्थळापासून जवळच्या ठिकाणी कार सीसीटीव्हीत कैद झाल्याचे दिसत आहे. या अपघातानंतर लोक अपघातस्थळाकडे पळून जाताना दिसत आहेत. या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला.
याप्रकरणी पोर्शे कारचालक मुलगा व त्याच्या वडिलांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्याचबरोबर पब चालकावरही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. विशेष म्हणजे पोर्शे कार भरधाव वेगात चालवून दोघांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेला मुलगा अल्पवयीन आहे.
या अपघातानंतर कार चालवणाऱ्या अल्पवयीन मुलाचे वडील व बिल्डर विशाल अगरवाल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर दारू देणाऱ्या हॉटेल कोझीचे मालक प्रल्हाद भुतडा आणि मॅनेजर सचिन काटकर, हॉटेल ब्लॅकचे संदीप सांगळे, बार काऊंटर जयेश बोनकर यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
संबंधित बातम्या