Porsche Accident : १ तास TV, २ तास खेळण्यासाठी; पोर्शे कांडातील आरोपीचे बाल सुधार गृहात कसे असेल रूटीन?
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Porsche Accident : १ तास TV, २ तास खेळण्यासाठी; पोर्शे कांडातील आरोपीचे बाल सुधार गृहात कसे असेल रूटीन?

Porsche Accident : १ तास TV, २ तास खेळण्यासाठी; पोर्शे कांडातील आरोपीचे बाल सुधार गृहात कसे असेल रूटीन?

Updated May 23, 2024 04:25 PM IST

Pune Porsche Accident : पुणे पोर्शे अपघातातील १७ वर्षीय अल्पवयीन आरोपीला आता बाल सुधार गृहात तेथील नियमांचे पालन करावे लागणार आहे. त्यामध्ये हेल्दी ब्रेकफास्ट,प्रार्थना आणि त्यानंतर तीन तास लँग्वेजेसचा अभ्यास करावा लागेल.

पोर्शे कांडातील आरोपीचे बाल सुधार गृहात कसे असेल रूटीन?
पोर्शे कांडातील आरोपीचे बाल सुधार गृहात कसे असेल रूटीन?

Pune Porsche Accident :  पुण्यातील कल्याणीनगर येथे लक्झरी कार पोर्शेच्या धडकेत दोन लोकांना जीव गमवावा. त्यानंतर अल्पवयीन आरोपीला काही तासातच त्याला जामीन मिळाली. मात्र हा मुद्दा सोशल मीडियावर गाजल्यानंतर लोकांनी प्रश्न उपस्थित करत जुवेनाइल कोर्टाने आरोपीचा जामीन रद्द करत त्याला बाल सुधार गृहात पाठवण्याचा आदेश दिला. आता १७ वर्षीय अल्पवयीन आरोपीला बाल सुधार गृहात तेथील नियमांचे पालन करावे लागणार आहे. त्यामध्ये हेल्दी ब्रेकफास्ट, प्रार्थना आणि त्यानंतर तीन तास लँग्वेजेसचा अभ्यास करावा लागेल. पुण्यातील बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने काही दिवसांपूर्वी अडीच कोटी किंमतीच्या पोर्शे कारने दोन आयटी प्रोफेशनल्सना उडवले होते. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पाच जूनपर्यंत बाल सुधार गृहात पाठवलेल्या आरोपीच्या दिवसाची सुरूवात पोहा, उपमा, अंडी आणि दूधाचा समावेश असलेल्या ब्रेकफास्टने होईल. हा नाष्ता त्याला सकाळी ८ ते १० वाजेपर्यंत दिला जाईल. त्यानंतर एक तास प्रार्थना करावी लागेल. त्यानंतर सकाळी ११ वाजल्यानंतर दुपारी एक वाजेपर्यंत क्लासेस एटेंड करावे लागतील. त्यानंतर दुपारी १ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत आरामाचा वेळ असेल. सायंकाळी चार वाजता आरोपीला स्नॅक्स दिले जातील व एक तास ते टीव्ही पाहू शकतात. दोन तासापर्यंत बाहेर खेळ खेळू शकणार आहेत. त्यामध्ये व्हॉलीबॉल आणि फुटबॉल सारखे गेम खेळू शकतात. सायंकाळी सात वाजता बाल सुधार गृहात ठेवलेल्या आरोपींना डिनर दिला जातो. त्यामध्ये रोटी-भाजी, भात आणि डाळ असतात. रात आठ वाजता आरोपींना पुन्हा आपल्या डॉरमेट्रीमध्ये जावे लागते व झोपावे लागते.

आरोपीचा जामीन रद्द करून बाल सुधारगृहात पाठवला-
रियल इस्टेट डेव्हलपर विशाल अग्रवाल (५०) यांच्या मुलाला किशोर न्याय बोर्डाच्या समोर हजर केले होते. तेथे काही तासातच आरोपीला जामीन मंजूर केला होता. त्यानंतर पोलिसांनी पुन्हा किशोर न्याय बोर्डात याचिका दाखल करत आदेशावर पुनर्विचार करण्याची विनंती केली होती. अपघातानंतर काही तासातच आरोपीला जामीन मंजूर झाल्याने समाजातील सर्व स्तरातून यावर टीका करण्यात आली. 

यानंतर बोर्डाने बुधवारी अल्पवयीन आरोपीला पाच जूनपर्यंत बालसुधार गृहात पाठवले. एका अधिकाऱ्याने म्हटले की, अल्पवयीन आरोपीला नेहरू उद्योग निरीक्षण केंद्रात पाठवला गेला. तेथे अन्य अल्पवयीन आरोपीही आहेत. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, निरीक्षण केंद्रात राहत असताना अल्पवयीन आरोपीची मानसिक स्थिती तपासली जाईल.

आरोपीला सज्ञान मानले जाणार की नाही? दोन महिन्याचा लागणार वेळ 
बाल न्याय बोर्डात सुनावणी दरम्यान अल्पवयीन मुलाची बाजू मांडणारे वकील प्रशांत पाटील यांनी सांगितले की, एखाद्या अल्पवयीन आरोपीला सज्ञान समजावे की नाही, हे निश्चित करण्यासाठी कमीत कमी दोन महिन्याचा कालावधी लागू शकतो. यासाठी मानसशास्त्रज्ञ आणि समुपदेशकांसह अन्य लोकांचे रिपोर्ट मागितले जातात. त्यानंतर बोर्ड आपला निर्णय देते. 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर