Pune porsche car case : पुण्यात कल्याणीनगर येथे झालेल्या पोर्श कार अपघताप्रकरणी धक्कादायक माहिती पुढे येत आहे. २० मे रोजी ससुनमध्ये आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलण्यात आल्याचे उघडकीस आले होते. या प्रकरणी ससुनच्या दोन बड्या डॉक्टरांना निलंबित करण्यात आले आहे. मात्र, बदललेले हे रक्ताचे नमुने कुणाचे होते हा प्रश्न अनुत्तरित होता. दरम्यान, पोलिस याचा शोध घेत होते. तपासादरम्यान, पुन्हा धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. या प्रकरणी नेमण्यात आलेल्या शासनाच्या चौकशी समितीने हे रक्ताचे नमुने एका महिलेचे असल्याचे म्हटले आहे. हे रक्ताचे नमुने आरोपी मुलाची आई शिवानी अगरवाल यांचे असल्याचे पुढे आले आहे. सध्या शिवानी अगरवाल या बेपत्ता असून त्यांचा फोन देखील बंद आहे. यामुळे या प्रकारी आता त्यांच्यावर देखील कारवाई होण्याची अथवा अटक होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
कल्याणीनगर अपघात झाल्यावर बड्या बिल्डरच्या आरोपी मुलाला १९ मे रोजी वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आले होते. या ठिकाणी त्याने मद्य प्यायलये आहे की नाही या साठी त्याच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले, मात्र, हे नमुने घेतांना डॉक्टरांनी आरोपीचे नमुने कचऱ्यात फेकून देत दुसऱ्या कुणाचे तरी नमुने तपासणी साठी दिले. या प्रकरणी सुसूनच्या फॉरेन्सिक विभागाचे प्रमुक डॉ. तावरे व डॉ. हरनोळ यांना अटक करण्यात आली असून त्यांना निलंबित देखील करण्यात आले आहे. मात्र, बदलण्यात आलेले हे रक्ताचे नमुने कुणाचे आहे या बाबत तपास सुरू होता. या प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीने बुधवारी अहवाल सादर केला. त्यात मुलाचे रक्ताचे नमुने हे एका महिलेचे असल्याचे पुढे आले आहे. दरम्यान, हे रक्त आरोपीच्या आईचा असल्याची चर्चा आहे.
आरोपी मुलाचा शिव्या देणाऱ्या एक फेक व्हिडिओ व्हायरल झाला होता. दिल्ली येथील एका तरुणाने तो आरोपीअसल्याचे म्हणत शिवराळ भाषेतील व्हिडिओ सोशल मिडियावर उपलोड केला होता. हा विडिओ आरोपीचा आहे म्हणून मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. यानंतर शिवानी अगरवाल या पुढे आल्या होत्या. हा व्हिडिओ त्यांच्या मुलाचा नसून त्यांनी हात जोडून माध्यमांसमोर रडतांना दिसल्या होत्या.
या प्रकरणी शिवानी अगरवाल यांच्यावर देखील कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिवानी अगरवाल यांनी मुलाचा गुन्हा स्वत:वर घेण्यासाठी ड्रायव्हरला धमकावले असल्याचा आरोप आहे. मात्र, रक्ताचे नमुने बदलल्या प्रकरणी आता त्यांचे नाव पुढे आले आहे. पोलिस त्यांच्या फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, त्यांचा फोन नोट रीचेबल येत आहे.
आरोपी मुलाची ससुनमध्ये चाचणी होत असतांना आरोपी मुलाचे वडील बिल्डर विशाल अगरवाल याने डॉ. तावरे यांना १४ वेळा कॉल केला असल्याची माहिती देखील तपासात पुढे आली आहे. या वेळी पैशांचा मोठा व्यवहार झाल्यावर आरोपीचे रक्ताचे नमुने हे कचऱ्यात फेकण्यात आले.
संबंधित बातम्या