राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पुण्यातच अजित पवार गटाला हादऱ्यावर हादरे बसत आहेत. मावळनंतर आता शिरुर लोकसभा मतदारसंघातील बडा नेता ठाकरे गटाच्या गळाला लागला आहे. अजित पवार यांचे खंदे समर्थक समजले जाणारे शैलेश शिवाजीराव मोहिते-पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. शैलेश मोहिते यांनी आदित्या ठाकरेंच्या उपस्थितीत हाती शिवबंधन बांधून घेतलं. मोहिते यांच्यासह त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे.
शैलेश मोहिते यांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश अजित पवारांसाठी मोठा धक्का मानला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ते पदाधिकारी होते. तळेगांव दाभाडे येथे शिवसेना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत शिवबंधन बांधून शैलेश मोहित पाटील यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसोबत ठाकरे गटात प्रवेश केला.
काही दिवसापूर्वी मावळ लोकसभा मतदारसंघातील अजित पवारांचे निकटवर्तीय आणि माजी महापौर संजोग वाघेरे यांना उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर आता शिरूर लोकसभेत शैलेश मोहितेंच्या रूपाने ठाकरेंनी अजित पवारांना आणखी एक धक्का दिला आहे.
शैलेश मोहिते हेआळंदी खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहितेंचे चुलत पुतणेआहेत. शैलेश यांनी राज्य राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी सरचिटणीस म्हणूनही काम पाहिले आहे. शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे हे आज पिंपरी चिंचवड शहर दौऱ्यावरअसून ठाकरे गटाने येथे जोरदार शक्तीप्रदर्शन केले .शिवसैनिकांनी मोठी बाईक रॅली काढूनआदित्य ठाकरेंचे जोरदार स्वागत केले.
संबंधित बातम्या