Pune khadak Police station Havaldar suicide : पुणे पोलिस दलात खळबळ उडवणारी एक घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. खडक पोलिस ठाण्यातील एका पोलिस शिपायाने आज पहाटेच्या सुमारास त्याच्या कार्बाइन मधून चार गोळ्या स्वत:वर झाडून आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. त्याने हे टोकाचे पाऊल का उचलले या बाबत माहिती मिळू शकली नाही.
पोलीस अंमलदार भारत दत्ता आस्मर असे आत्महत्या केलेल्या पोलिस अंमलदाराचे नाव आहे. भारत दत्ता आस्मर हे खडक पोलीस ठाण्यात कामाला होते. त्यांनी शुक्रवारी (५ एप्रिल) पहाटे लोहिया नगर पोलीस चौकीत स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. पोलीस चौकीमध्ये कोणी नसताना येथील आराम खोलीत जात खोलीचे दार आतून बंद करून त्याने कार्बाइनच्या साह्याने स्वत:वर चार गोळ्या झाडल्या. यात त्याचा जागेवरच मृत्यू झाला. भारत अस्मार हा काही वर्षांपूर्वीच पोलिस दलात दाखल झाला होता. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहचले आहे. पोलीस चौकीमध्येच घडलेल्या या प्रकारामुळे पुणे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भारत आस्मर हे खडक पोलीस स्टेशन अंतर्गत लोहिया नगर पोलीस चौकीत ड्यूटीवर होते. काल रात्री ते चौकटी होते. आज सकाळी त्यांनी येथील आराम खोलीत जात स्वत:ला आत बंड करून पहाटेच्या सुमारास स्वत:च्या कार्बाइन मधून चार गोळ्या झाडून आत्महत्या केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, आस्मार यांनी आत्महत्या का केली याचा शोध पुणे पोलिस घेत आहेत.
पुण्यातील विमाननगर येथून एका माॅलमधून महाविद्यालयीन तरुणीचे अपहरण करण्यात आले आहे. खंडणीसाठी हे अपहरण करण्यात आले आहे. खंडणी न दिल्यास तरुणीचा खून करण्याची धमकी अपहरणकर्त्याने मुलीच्या वडिलांना दिली आहे. मुलीच्या वडिलांनी विमानतळ पोलीस ठाण्यात या प्रकरणी फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार हे लातूर येथील रहिवाशी आहे. त्यांची मुलगी पुण्यात शिक्षण घेत असून ती विमाननगर परिसरात राहण्यास आहे. ही तरुणी विमानगरमधील एका माॅलमध्ये गेली असता तिचे अपहरण करण्यात आल्याची माहिती आहे. अपहरणकर्त्याने तरुणीच्या वडिलांच्या फोनवर संपर्क साधून नऊ लाख रुपयांची मागितले असून पैसे न दिल्यास मुलीला ठार मारण्याची धमकी दिली आहे.