पुण्यात नदी पात्रात आढळलेल्या 'त्या' मृतदेहाचं गूढ उकललं; संपत्तीच्या वादातून भावानं व वहिनीनं केला खून
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  पुण्यात नदी पात्रात आढळलेल्या 'त्या' मृतदेहाचं गूढ उकललं; संपत्तीच्या वादातून भावानं व वहिनीनं केला खून

पुण्यात नदी पात्रात आढळलेल्या 'त्या' मृतदेहाचं गूढ उकललं; संपत्तीच्या वादातून भावानं व वहिनीनं केला खून

Published Sep 01, 2024 01:52 PM IST

Pune kharadi Crime News : पुण्यातील नदी पात्रात डोकं नसलेला मृतदेह आढळला होता. या मृतदेहाचं गूढ उलगडलं आहे. संपत्तीच्या वादातून महिलेचा खून करण्यात आला. भाऊ आणि वाहिनीने त्याचा खून केला आहे.

पुण्यात नदी पात्रात आढळलेल्या 'त्या' मृतदेहाचं गूढ उकलं; संपत्तीच्या वादातून भावानं व वहिनीनं केला खून
पुण्यात नदी पात्रात आढळलेल्या 'त्या' मृतदेहाचं गूढ उकलं; संपत्तीच्या वादातून भावानं व वहिनीनं केला खून

Pune kharadi Crime News : पुण्यात काही दिवसांपूर्वी खराडी येथे मुळा मुठा नदी पात्रात शिर नसलेला महिलेचा मृतदेह आढळला होता. या घटनेने खळबळ उडाली होती. या मृतदेहांचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. संपत्तीच्या वादातून या महिलेची तिच्या भावाने आणि वाहिनीने हत्या केल्याचं उघडं झालं आहे. पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

सकिना खान असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर अशपाक खान आणि वहिनी हमीदा अशी आरोपींची नावे आहेत. झोपडपट्टीतील एका खोलीच्या मालकीच्या वादातून सख्खा भाऊ व वहिनीने सकीनाची हत्या केली. घरातच शास्त्राच्या साह्याने तिच्या शरीराचे तुकडे केले. यानंतर पुण्यात सुरू असलेल्या पावसाचा फायदा घेत तिचा मृतदेह संगमवाडी नदीपात्रात फेकून दिला होता. त्यानंतर सकीना गावाला गेल्याची खोटी माहिती शेजाऱ्यांना दिली.

काय आहे घटना ?

पुण्यात खराडी येथे नदीपात्रात २६ ऑगस्ट रोजी मुळा मुठा नदीपात्रात डोक व हात-पाय नसलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती.

असा झाला हत्येचा उलगडा

पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला. पुण्यातील पाटील इस्टेट भागत सकिना भाऊ आणि वाहिनी सोबत राहत होती. ज्या खोलीत ते राहत होते ती सकिना हिच्या नावावर होती. तिच्या भावाने सकिना हिला खोली नावावर करून देण्यास सांगितले होते. दरम्यान, तिने खोली नावावर करून देत नसल्याने त्याने तिची हत्या केली. यानंतर घरातच तिच्या मृतदेहांचे तुकडे करून ते नदीपात्रात फेकून दिले. यानंतर सकिना ही घरातून निघून गेल्याच बनाव त्यांनी रचला. बरेच दिवस सकिना दिसली नसल्याने शेजऱ्यांचा संशय बळावला. त्यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात ती हरवल्याची तक्रार दिली.

पोलिस धड नसलेल्या मृतदेहाचा शोध घेत असतांना बेपत्ता नागरिकांची माहिती घेत होते. यातून हा प्रकार उघडकीस आला. पोलीसांनी सकिनाचा भाऊ अशपाक खान व वहिनी हमीदा यांना अटक केली असून त्यांनी खुनाची कबुली दिली आहे. सकिना ही खोली नावावर करून देत नसल्याने तसेच तिला ते घरातून निघून जाण्यास सांगत असतांना देखील ती जात नसल्याने त्यांनी तिचा खून केला.

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर