Pune PSI Death : पुण्यात मंगळवारी अनेकांनी सरत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. मात्र, नवीन वर्षाच्या सुरवातीलाच मन सुन्न करणारी एक घटना उघडकीस आली आहे. नववर्षानिमित्त बंदोबस्तावर असतांना काम संपवून घरी जाणाऱ्या एका पिंपरीचिंचवड येथील एका पोलिस निरीक्षकांवर काळाने घाला घातला आहे. भरधाव वेगातील पोलिस कार ही कंटेनरला पाठीमागून धडकल्याने पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र गिरनार यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र गिरनार हे नवीन वर्षानिमित्त बंदोबस्तावर होते. ते त्यांची रात्रपाळी करून घरी जात होते. यावेळी त्यांची कार भरधाव वेगात असतांना त्यांच्या कारने पाठीमागून एका कंटेनरला जोरदार धडक दिली. या अपघातात गिरनार यांच्या कारचा चक्काचूर झाला आहे. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. गिरनार हे वाकड पोलीस स्टेशनला कार्यरत होते. काही दिवसांपूर्वी त्यांची बदली ही महाळुंगे पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. नवीन वर्षाचे स्वागत करून घरी जात असतांना त्यांचा अपघाती मृत्यू झाला.
पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र गिरनार हे नववर्षाच्या स्वागतावेळी कुठलीही दुर्घटना घडू नये, म्हणून चाकण एमआयडीसीमध्ये पेट्रोलिंग करत होते. त्यांची ड्यूटी संपवून ते कारमधून जात होते. यावेळी समोरुन उजव्या बाजुने निघालेला कंटेनर अचानक त्यांच्या डाव्या बाजूला शिरला. त्यामुळे डाव्या बाजूने चाललेल्या गिरनार यांच्या गाडीची कंटेनरला जोरात धडक बसली. गिरनार हे पुढच्या सीटवर बसले होते. या घटनेत त्यांना जबर मार बसला. ते गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. सर्वांशी मिळून मिसळून राहण्याचा गिरनार यांचा स्वभाव होता. मात्र अचानक नवीन वर्षाच्या सुरवातीलाच त्यांचा अपघाती मृत्यू झाल्याने पिंपरीचिंचवड पोलिस व गिरनार यांच्या कुटुंबंवर व मित्र परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
संबंधित बातम्या