पोलीस दलातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. पुण्यातील पोलीस आयुक्तालयातील उपनिरीक्षकाने लोणावळ्यात जाऊन आपलं जीवन संपवलं आहे. लोणावळ्यातील टायगर पॉईंटजवळ एका झाडाला गळफास घेत त्यांनी आपलं आयुष्य संपवलं आहे. टायगर पॉईंटजवळच त्यांची कार सापडली असून त्यात एक डायरीही पोलिसांच्या हाती लागली आहे. त्यातून आत्महत्येच्या कारणाचा खुलासा होऊ शकतो. या घटनेने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
अण्णा गुंजाळ असं आत्महत्या केलेल्या पोलीस उपनिरीक्षकांचे नाव असून त्यांनी नेमकी आत्महत्या का केली याबाबतचं कारण अद्यापही समोर आलेलं नाही.
मिळालेल्या माहितीनुसार गेल्या तीन दिवसांपासून गुंजाळ कामावर गेले नव्हते. त्यांचा काहीच पत्ता नव्हता. फोन देखील लागत नव्हता. मात्र, आज (शुक्रवार) गुंजाळ यांनी आत्महत्या केल्याची माहिती लोणावळा पोलिसांनी दिली आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. ३ दिवसांपासून घरातून ते बेपत्ता होते तसेच त्यांचा संपर्कही होत नव्हता. त्यामुळे गुंजाळ नेमके गेले कुठे असा प्रश्न निर्माण झाला होता. खडकी पोलीस ठाण्यात ते बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात येणार होती. मात्र त्याआधीच त्यांचा मृतदेह लोणावळ्यात सापडला आहे.
लोणावळ्यातील टायगर पॉइंटवर त्यांनी एका झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. जवळच त्यांची गाडी सुद्धा आढळलेली असून त्या गाडीत एक डायरी आहे. कदाचित या डायरीमध्ये त्यांनी आत्महत्येचं कारण नमूद केलेलं असू शकतं. लोणावळा ग्रामीण पोलीस घटनास्थळी पोहचलेले असून खडकी पोलीसही घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत. पोलिसांकडून त्यांचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून पाँईटवर असलेली गाडीही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. आता, या कारमधील डायरीत त्यांनी मृत्यूपूर्व काही लिहून ठेवले आहे का, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.
संबंधित बातम्या