Pune Police seized 1100 core druges from kurkumbh MIDC: पुणे पोलिसांनी ड्रग्स माफियांवर फास आवळला आहे. सोमवारी सुमारे १०० कोटी रुपयांचे एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले होते. ही कारवाई ताजी असतानाच मंगळवारी सकाळी कुरकुंभ औद्योगिक वसाहतीत एका औषध निर्माण कंपनीत तब्बल ११०० कोटी रुपयांचे ६०० कीलो पेक्षा जास्त एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी काही जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी ललित पाटील प्रकरणात रांजणगाव औद्योगिक वसाहतीत एका कंपनीतून मोठ्या प्रमाणत ड्रग्स जप्त करण्यात आले होते. त्यानंतर करण्यात आलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे.
पुणे पोलिसांनी दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये सोमवारी तब्बल १०० कोटीहून अधिक रक्कमेचे ड्रग्स जप्त केले आहे. ड्रग्स तस्कर मिठाच्या आडून ही विक्री केली जात होती. ही कारवाई विश्रांतवाडी येथे करण्यात आली होती. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने या ठिकाणी तब्बल ५२ किलो पेक्षा आधिक मेफेड्रॉन जप्त केले होते. या प्रकरणात या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली होती. वैभव ऊर्फ पिंट्या भारत माने (रा. पुणे), अजय अमरनाथ करोसिया (वय ३५, रा. पुणे) आणि हैदर शेख (रा. विश्रांतवाडी) यांना अटक करण्यात आली होती. दरम्यान यांच्या कडून गुन्हे शाखेच्या पथकाला कुरकुंभ औद्योगिक वसाहतीत मोठ्या प्रमाणात ड्रग्स तयार होत असल्याची माहिती मिळाली त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
या संदर्भात माहिती देताना पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, ही कारवाई कुरकुंभ (ता.दौंड) औद्योगिक क्षेत्रातील अर्थ फेम लॅबोरेटरीज कंपनीवर करण्यात आली आहे. अनिल साबळे नामक एक व्यक्ती ही कंपनी चालवत होता. काल सोमवारी अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून या बाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार आज सकाळी गुन्हे शाखेच्या पथकाने या कारखान्यावर कारवाई केली. कारखान्यावर धाड टाकली तेव्हा तब्बल ६००किलो ड्रग्स सापडले. हे ड्रग्स संपूर्ण देशात विक्रीसाठी पाठवले जाणार होते. मात्र, त्यापूर्वीच हे रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आले आहे. ड्रग्स तरस्करांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांचे पथक संपूर्ण राज्यात कारवाई करत आहे. या सोबत केंद्रीय तपास यंत्रणा देखील तपास कार्य राबत आहे. राज्यातील ड्रग्स रॅकेट उद्ध्वस्त करण्याचा आमचा मानस आहे. या प्रकरणात आंतरराष्ट्रीय टोळीचा हात असल्याची शक्यता आहे. तसेच देशाबाहेरील व्यक्ती हे रॅकेट चालवत असल्याचा संशय आहे. त्या दृष्टीने आमचा तपास सुरू आहे.
आयुक्त आमितेश कुमार म्हणाले, सध्या सुरू असलेल्या तपासात ललित पाटील प्रकरणाशी संबंध दिसून आलेला नाही. तसेच कोणत्याही राजकीय नेत्याचा समावेश या प्रकरणी दिसून आलेला नाही.
पुण्यात मोठ्या प्रमाणात तरुणाई आहे. ही तरुणाई नशेच्या विळख्यात सापडली आहे. त्यामुळे पुणे ड्रग्स फ्री करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.
कुरकुंभ औद्योगिक वसाहतीत तब्बल २० गुंठयात ही कंपनी चालवली जात होती. ही कंपनी २००६मध्ये सुरू करण्यात आली होती. सुयमरे ४० कामगार या कंपनीत कामाला होते. या कंपनीत आधी पेंटमध्ये टाकण्यात येणारे गंजविरोधी केमिकल तयार करण्यात येत होते. यानंतर मेलेरिया आजाराबाबत तयार करण्यात येणाऱ्या औषधांचे काही पदार्थ या ठिकाणी तयार केले जात होते. तसेच काही दिवसांपासूंन एमडी ड्रग्स तयार केले जात होते. हे एमडी ड्रग्स तयार केल्यावर त्याचे ५०० ग्रॅमचे पॅकेट तयार करून कुरिअर बॉय मार्फत हे ड्रग्स विश्रांतवाडी येथील गोदामात पाठवले जात होते. यानंतर, येथून हे ड्रग्स, पुणे, मुंबई, दिल्ली या सारख्या देशभरातील मेट्रो शहरात विक्रीसाठी पाठवले जात होते.
संबंधित बातम्या