Pune Drugs racket : पुण्यातील ड्रग्स विक्री रॅकेट उद्ध्वस्त करणार! ५० जण रडारवर; पोलिसांची शोधमोहीम-pune police search 50 retail drug dealers after bust major drug racket ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Drugs racket : पुण्यातील ड्रग्स विक्री रॅकेट उद्ध्वस्त करणार! ५० जण रडारवर; पोलिसांची शोधमोहीम

Pune Drugs racket : पुण्यातील ड्रग्स विक्री रॅकेट उद्ध्वस्त करणार! ५० जण रडारवर; पोलिसांची शोधमोहीम

Mar 01, 2024 12:51 PM IST

Pune Drugs racket : ड्रग्स तस्करी प्रकरणी ड्रग्स विक्री करणारे तब्बल ५० जन पुणे पोलिसांच्या रडारवर आहेत. या साठी राज्यभरात मेट्रो शहरात पुणे पोलिसांचे पाठक शोध मोहीम राबवणार आहे.

पुण्यातील ड्रग्स विक्री रॅकेट उद्ध्वस्त करणार! ५० जण रडारवर
पुण्यातील ड्रग्स विक्री रॅकेट उद्ध्वस्त करणार! ५० जण रडारवर (HT_PRINT)

Pune Drugs racket : पुणे पोलिसांनी कुरकुंभ एमआयडीसीत मोठी कारवाई करत ड्रग्स निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त केला. तसेच, दिल्ली, सांगली, सोलापूर या ठिकाणी देखील कारवाई करत तब्बल ३ हजार ५०० कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त केले. या प्रकरणी आता पर्यंत ११ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, ड्रग्स विक्री करणारे रेटेल विक्रेत्यांचा शोध पुणे पोलिस घेत असून तब्बल ५० जण पुणे पोलिसांच्या रडारवर आहेत. त्यांना अटक करण्यासाठी राज्यातील मेट्रो शहरात शोध मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

Sambhaji Bhide : मोठी बातमी! नाशिकच्या मनमाडमध्ये संभाजी भिडेंच्या गाडीवर हल्ला; काळे झेंडेही दाखवले

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने विश्रांतवाडी, कुरकुंभ आणि दिल्ली येथे छापे टाकून ड्रग्स तसक्रीचे मोठे रॅकेट उद्ध्वस्त केले. या टोळीचा म्होरक्या संदीप धुनिया हा इंग्लंडमध्ये फरार झाला आहे. त्याला अटक करण्यासाठी लूक आऊट आणि रेड कॉर्नर नोटीस पुणे पोलिसांनी काढली आहे. दरम्यान केंद्रीय तपास यंत्रणा देखील आता या प्रकरणी तपास करत आहेत. या प्रकरणी ९ जणांना अटक करण्यात आली आहे. यातील एकाला बंगाल मधून बुधवारी रात्री अटक करण्यात आली, दरम्यान, सुनील बरमन, दिलीप भुजबळ, यांना कोर्टात आणले असता त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. तर इतर सहा आरोपींचा शोध पुणे पोलीस घेत आहेत.

पुणे पोलिसांनी ड्रग्स निर्मिती, वाहतूक आणि घाऊक विक्रीची साखळी नष्ट केली आहे. आता त्यांनी त्यांचा मोर्चा रिटेल ड्रग्स विक्रेत्यांकडे वळवला आहे. किरकोळ विक्रेते आणि पेडलरचा शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली असून तब्बल ५० जण पुणे पोलिसांच्या रडावर आहेत. त्यांची नावे निष्पन्न झाली असून या सर्वांचा शोध घेतला जात आहे. ही सर्व अंमली पदार्थ विक्रीतील सराईत गुन्हेगार आहेत. त्यांना अटक करण्यासाठी विशेष पथक स्थापन करण्यात आले असून राज्यभर आरोपींचा शोध घेतला जाणार आहे. ही टोळी विशेषत: मेट्रो शहरात सक्रिय असल्याची माहिती आहे. या सोबतच पुण्यात अमली पदार्थ विक्रेत्यांबरोबरच गांजाची विक्री करणाऱ्या गुन्हेगारांवरही कारवाई करण्यात येणार आहे. तब्बल ५०० ते ६०० जणांची नावे पुढे आली असून त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे.

Whats_app_banner
विभाग