मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Porsche accident : अनिल देशमुख यांच्या आरोपांनंतर पोर्श अपघात प्रकरणी पुणे पोलिसांचा घाईघाईनं खुलासा

Pune Porsche accident : अनिल देशमुख यांच्या आरोपांनंतर पोर्श अपघात प्रकरणी पुणे पोलिसांचा घाईघाईनं खुलासा

Jun 14, 2024 12:20 PM IST

Pune Porsche Crime News: धनिकपुत्राचा खोटा ब्लड रिपोर्ट तयार करण्याचा डाव फसल्यानंतर मृत मुलांचा व्हीसेरा रिपोर्ट बदल्यात येत असल्याचा आरोप माजी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला होता. यावर पुणे पोलिसांनी खुलासा केला आहे.

अनिल देशमुख यांच्या आरोपांनंतर पुणे पोलिसांचा घाईघाईनं खुलासा
अनिल देशमुख यांच्या आरोपांनंतर पुणे पोलिसांचा घाईघाईनं खुलासा

Pune Porsche Crime News: Pune Porsche Accident : पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी खळबळजनक आरोप केल्यानंतर पुणे पोलिसांनी या प्रकरणी खुलासा केला आहे. अनिल देशमुख यांनी पोर्शे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दोघांचा व्हिसेरा रिपोर्ट अल्कोहोल पॉझिटिव्ह यावा म्हणून तयारी करण्यात आली आहे, असा आरोप केला होता. मात्र, अशा कोणत्याही रीपोर्टचा या प्रकरणावर कोणातही परिणाम होणार नाही, असे पुणे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

pune porsche accident : कारखाली मारले गेलेले तरुण-तरुणीच नशेत होते असं दाखवण्याचा प्रयत्न होतोय, अनिल देशमुख यांचा आरोप

पोर्शे दुर्घटनेतील पीडितांच्या व्हिसेरा अहवालाशी छेडछाड करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोप अनिल देशमुख यांनी केल्यानंतर पुणे पोलिसांनी या अहवालाच्या निकालाचा या प्रकरणावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट केले. पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, अद्याप मृतांचा अंतिम शवविच्छेदन अहवाल आम्हाला मिळालेला नाही. बिल्डर विशाल अगरवालच्या मुलाने रात्री दारूच्या नशेत आलीशान पोर्शे कार चालवत १९ मे रोजी अनिस अवधिया व अश्विनी कोस्टा या दोघांना चिरडले होते. या दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. अनिस आणि अश्विनी मद्यधुंद अवस्थेत असल्याचे दिसून येत असले, तरी आरोपी तरुणाने चालविलेल्या पोर्शेने त्यांना पाठीमागून धडक दिल्याने याचा या प्रकरणावर काहीही परिमाण होणार नाही. मृत दोघांचा व्हीसेरा अहवालात जरी ही बाब उघड झाली असली तरी आरोपीने ज्या प्रकारे त्यांना धडक दिली आहे, त्याचा विचार केल्यास या प्रकरणाव कोणताही परिणाम होत नाही, असे कुमार यांनी सांगितले.

mumbai ice cream : माणसाचं तुटलेलं बोट आढळलेलं 'ते' आईसक्रीम गाझियाबादच्या कंपनीत झाले होते तयार!

विशाल अगरवाल या बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने कल्यानीनगर येथे लक्झरी कार चालवत अनीश अवधिया व अश्विनी कोष्टा या दोघांना धडक देऊन ठार मारले होते. हे दोघेही मद्यधुंद होते हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला होता. अनिस आणि अश्विनी यांच्यामुळे हा अपघात झाला असा युक्तिवाद न्यायालयात केला जाऊ शकतो आणि सध्या निरीक्षण गृहात असलेल्या अल्पवयीन मुलाची पोर्श अपघात प्रकरणात सुटका होऊ शकते, असे अनिल देशमुख म्हणाले होते.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एक्सवर या प्रकरणी पोस्ट केली होती. त्यात त्यांनी लिहिले होते की, 'पुणे पोर्श अपघात प्रकरणात राजकीय दबावाखाली आरोपींच्या रक्ताचे नमुने बदलून आरोपींनी मद्यपान केले नसल्याचा अहवाल तयार करण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे. आता माजी गृहमंत्री या नात्याने माझी माहिती अशी आहे की, मृतव्यक्तीच्या व्हिसेरा अहवालात अल्कोहोल पॉझिटिव्ह दाखवण्याची तयारी करण्यात आली आहे. त्यामुळे मृत्यू मुखी पडलेल्या मोटारसायकलवरील आयटी व्यावसायिक मद्यधुंद अवस्थेत होते आणि त्यांच्यामुळेच हा अपघात झाल्याचे न्यायालयात सिद्ध होऊ शकते. जेणेकरून बिल्डरच्या मुलाची लवकर सुटका होऊ शकेल.

देशमुख यांच्या आरोपांवर भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले की, मृत पबमधून परतत होते हे सर्वश्रुत आहे. मृत व्यक्तीने मद्यप्राशन केल्याचे निष्पन्न झाले तरी या प्रकरणात काहीही फरक पडणार नाही. पण माजी गृहमंत्र्यांना हे समजणार नाही, असे टीका उपाध्ये यांनी केली होती.

WhatsApp channel
विभाग