Pune Nylon Manja Problem : पुण्यासह राज्यात नायलॉन मांजामुळे अनेक जण गंभीर जखमी झाले आहे. तर काहींचा जीव देखील गेला आहे. असे असतांना देखील या मांजाच्या विक्रीवर कोणतीही कारवाई होत नसल्याचं पुढं आलं आहे. गेल्या पाच वर्षात केवळ १६ गुन्हे या प्रकरणी दाखल झाल्याने कारवाईचा केवळ फार्स होत असल्याचं देखील स्पष्ट झालं आहे.
२०१७ पासून हानिकारक नायलॉन मांजाचे उत्पादन, विक्री व वापरावर बंदी घालण्यात आली आहे. बारीक काचेचा लेपित धागा असणारा हा नायलॉन मांजा पुण्यात सर्रास विकल्या जात आहे. पुणे शहरात गेल्या पाच वर्षांत नायलॉन मांजाचे किमान १६ गुन्हे पोलिसांनी दाखल केले आहे. २०२३ मध्ये सर्वाधिक ७ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या वर्षी देखील काही गुन्हे पोलिसांनी दाखल केले आहे. या वर्षी १५ डिसेंबरपर्यंत पोलिसांनी फक्त चार गुन्हे दाखल केले आहेत. तर पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
महाराष्ट्र सरकारने मानव, प्राणी आणि पर्यावरणाच्या सुरक्षेचा हवाला देत पतंग उडवण्यासाठी नायलॉन मांजाच्या धाग्यांचे उत्पादन, विक्री आणि वापर करण्यावर बंदी घालणारी अधिसूचना जारी केली होती. सरकारने बंदीचे उल्लंघन केल्याबद्दल दंड देखील ठोठावला आहे. ज्यामध्ये ५ हजार रुपयापर्यंत दंड आणि ३ वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाचा देखील समावेश आहे.
विशेषत: मकरसंक्रांतीच्या सणाच्या निमित्ताने पतंग उडवताना या धाग्याचा वापर केला जातो. झाडांमध्ये किंवा रस्त्याच्या कडेला अडकलेला या मांजामुळे अनेक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. यात सर्वाधित फटका पशू पक्षांना बसला आहे. आरईएसक्यू चॅरिटेबल ट्रस्ट या एनजीओने वन विभागासोबत २०२३ मध्ये मांजामुळे जखमी झाल्याचे ३२७ घटना नोंदवल्या. तर या वर्षी जानेवारी २०२४ च्या पहिल्या १७ दिवसांत ४० पक्षी मांजामुळे जखमी झाल्याच्या घटना नोंदवल्या गेल्या. तर अग्निशमन विभागाकडे देखील मांझामुळे तारांमध्ये पक्षी अडकल्याच्या अनेक तब्बल २० तक्रारी मिळाल्या आहेत.
पुण्यात डिसेंबर महिन्यात मांजामुळे कापल्यामुळे दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. मार्केट यार्ड आणि शिवणे परिसरात या घटना घडल्या. दरम्यान, मकर संक्रांतीचा सण जवळ आल्याने पुणे पोलिसांनी शहरातील बंदी असलेल्या मांजाच्या विक्रीला आळा घालण्यासाठी कडक कारवाई करण्याचे नियोजन करण्याची मागणी करण्यात आली आहे. केले आहे.
या बाबत अतिरिक्त पोलिस आयुक्त गुन्हे शाखेचे शैलेश बलकवडे म्हणाले, हा मांजावर राज्यात बंदी आहे. आम्ही नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी हा हानिकारक धागा वापरणे टाळावे आणि त्याऐवजी त्यांनी बाजारात उपलब्ध असलेल्या व इको फ्रेंडली धाग्यांची निवड करावी.
पुण्यातील 'टेल अस'चे सदस्य लोकेश बापट आणि मुकुंद शिंदे म्हणाले, 'दरवर्षी संक्रांत सणाच्या काही दिवस आधी आणि नंतर तळजाई टेकडीवर जाऊन झाडे, झुडपे किंवा इतर कोणत्याही भागात अडकलेले पतंग आणि मांजा आम्ही धागा गोळा करतो. या मोहिमेत तब्बल चार ते पाच पोती भरून मांजा आम्ही गोळा केला आहे. यावेळी काही पक्षी देखील या धाग्यात आढळले आम्ही पाहिले आहे. त्यांची सुटका देखील आम्ही केली आहे.
लोकेश बापट म्हणाले, 'मांजा विकणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याबाबत गेल्या काही वर्षांपासून पुणे महापालिकेला आम्ही पत्र व्यवहार केला आहे. मात्र, या बंदी घातलेल्या मांजचा वापर अद्याप थांबलेला नाही. मनपा केवळ जनजागृती नोटीस बजावते. या एवजी ठोस कृती आराखडा तयार करायला हवा.
संबंधित बातम्या