पुणे ड्रग्ज प्रकरणाचे सांगली कनेक्शन; मीठाच्या पोत्यात लपवलेलं तब्बल ३०० कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  पुणे ड्रग्ज प्रकरणाचे सांगली कनेक्शन; मीठाच्या पोत्यात लपवलेलं तब्बल ३०० कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त

पुणे ड्रग्ज प्रकरणाचे सांगली कनेक्शन; मीठाच्या पोत्यात लपवलेलं तब्बल ३०० कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त

Published Feb 22, 2024 12:06 AM IST

Sangli Drugs Case : पुणे गुन्हे शाखेच्या पथकाने सांगली पोलिसांच्या मदतीने टाकलेल्या छाप्यात कुपवाडमध्ये मिठाच्या पोत्यात लपवून ठेवलेले ३०० कोटींचे १४० किलो एमडी ड्रग जप्त केले आहे.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे पोलिसांच्या गु्न्हे शाखेने दिल्लीनंतर सांगलीत छापे टाकून मेफेड्रोन (एमडी) जप्त केले. पुणे गुन्हे शाखेच्या पथकाने सांगली पोलिसांच्या मदतीने टाकलेल्या छाप्यात कुपवाडमध्ये मिठाच्या पोत्यात लपवून ठेवलेले ३०० कोटींचे १४० किलो एमडी ड्रग जप्त केले आहे. या प्रकरणी आयुब मकानदार याच्यासह दोन जणांना ताब्यात घेतले असून अजूनही छापेमारी सुरू आहे.

दिल्लीत केलेल्या कारवाईत पोलिसांनी ९७० मेफेड्रोन जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी दिल्लीतून दोघांना अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी आतापर्यंत साडेतीन हजार कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त केले आहे. पुणे पोलिसांनी दिल्ली व पुण्यातील ड्रग्ज कारवाईनंतर सांगलीत कारवाई करण्यात आली. सांगलीजवळील कुपवाड येथे मोठ्या प्रमाणात एमडी ड्रग्जचा साठा असल्याच्या खात्रीलायक माहितीवरून पुणे पोलिसांच्या तपास पथकाने कुपवाड स्वामी मळा येथे एका गोडाऊनवर छापा टाकला. यामध्ये १४० किलो ड्रग्ज जप्त केले. ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारात ३०० कोटींच्या आसपास किंमत आहे.

पुणे क्राईम ब्रँच आणि कुपवाड एमआयडीसी पोलीस यांच्या संयुक्त पथकाने आज दिवसभरात कुपवाड मधील वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकत कारवाई केली. याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेला आयुब मकानदार याच्यावर यापूर्वीही ड्रग्ज तस्करीचा गुन्हा दाखल होता. तसेच तो सात वर्ष येरवडा कारागृरात होता.

मेफेड्रोन तस्करी प्रकरणाचे धागेदोरे परदेशात असून, त्यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. पुणे पोलिसांनी प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांचा साठा जप्त केला असून फेड्रोन तस्करीत आंतराष्ट्रीय पातळीवरील बडे तस्कर सामील असल्याचा संशय आहे. 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर