पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात अचानक मोठा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. पुणे पोलिस सध्या अलर्ट मोडवर असून सोशल मीडियावर देखील लक्ष ठेवण्यात आले आहे. सातारा जिल्ह्यातील पुसेसावळीत झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीसांनी महत्वाचे पावले उचलली आहेत. त्यानुसार हा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. या सोबतच नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन देखील करण्यात आले आहे. या सोबतच इन्स्टाग्राम अथवा सोशल मिडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्यास थेट कारवाईचा सीहारा देण्यात आला आहे.
पुण्यात काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. या साठी पुण्यात चोख बंदोबस्त ठेवला जाणार आहे. पुणे पोलिसांनी याची तयारी देखील केली आहे. दरम्यान, सातारा जिल्ह्यातील पुसेवाळी येथे सोशल मिडियावर पोस्ट केल्यामुळे दंगली भडकल्या होत्या. या दंगलीत दोघांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे पुणे पोलिस देखील सतर्क झाले आहे. पुणे शहरात पोलिसांनी तगडा बंदोबस्त वाढवला आहे. येणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अलर्ट मोडवर आहेत.
दरम्यान, पुण्यातील औंध येथे रविवारी दोन तरुणांच्या इन्स्टाग्रामवर पोस्टवरवरुन आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आली होती. यावरून दोन गटात तनावाचे वातावरण तयार झाले होते. जमावाने रात्री दुचाकी आणि चार चाकी वाहने पेटवून दिली होती. यावेळी पोलिसांनी घटनास्थळी जात परिस्थिती नियंत्रणात आणली होती. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी सोशल मीडिया वाप्रणाऱ्यांना इशारा दिला आहे. पोस्ट करण्यापूर्वी विचार करावा तसेच वाद निर्माण होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. आक्षेपार्ह पोस्ट केल्यास कारवाईचा इशारा देखील पुणे पोलिसांनी दिला आहे.