Pune police commissioner Amitesh Kumar : ''गुन्हेगारांनो पोलिस यंत्रणेचा अंत पाहू नका. आधी हात जोडू मात्र, संयम तुटला तर कडक कारवाई करू. पोलिसांची दादागिरी काय असते, ते दाखवू'' असा सज्जड दम पुणे पोलिस आयुक्त आयुक्त अमितेश कुमार पुण्यातील गुन्हेगारांना दिला आहे. पुण्यातील येरवडा येथे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या नागरी संवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीबाबत चिंता व्यक्त करत गुन्हेगारांना निर्वाणीचा इशारा दिला आहे.
येरवडा येथे आंतर्धमीय विवाहवरून झालेला खून यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर अमितेश कुमार यांनी येथे नागरी संवादाचे आयोजन केले होते. गुन्हेगारांना चाप लावण्यासाठी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुन्हेगारी टोळ्या आणि सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश गुन्हे शाखेला दिले आहे. पुण्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक गैरप्रकार उघडकीस आली आहे. कोयता गँग, हामाणारी, गाड्यांची तोडफोड आदी माध्यमातून गुन्हेगार दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. शांतता अबाधित राहण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न केला पाहिजे. पुणे पोलिसांचा संयम तुटला तर कडक कारवाई करण्यात येईल, असे देखील अमितेश कुमार म्हणाले.
पुण्यातील अनेक कुख्यात गुंडांची कुंडली तयार करण्यात आल्याचे अमितेश कुमार यांनी यावेळी सांगितले. तसेच भाईंच्या नावाने सोशल मीडियावर अनेकांनी तयार केलेल्या अकाउंटवर देखील पुणे पोलिसांची नजर आहे. जर कुठल्या ही गुन्हेगारीचे उदात्तीकरण केल्यास किंवा दहशत माजवण्याच्या उद्देशाने पोस्ट केल्यास संबंधिताचे अकाऊंट तर सस्पेंड होईल त्या सोबतच त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असे देखील आयुक्त म्हणाले.
पुण्यात झालेल्या पोर्शे प्रकरणी आणि ड्रग्स केस प्रकरणी पुणे पोलिसांवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. ही प्रतिमा सुधारण्यासाठी पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पोलिसांची बाजू मांडली. तसेच पुण्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी त्यांनी कठोर पावले उचलली जात असल्याचे देखील संगितले.