मराठी बातम्या  /  Maharashtra  /   Pune Police Case Has Been Registered Under Posco Against School Students After Instagram Status Will You Marry Me

Pune: माझी बायको होशील का? १४ वर्षीय मुलानं १३ वर्षीय मुलीसाठी ठेवला इन्स्टाग्रामवर स्टेटस

Pune Crime
Pune Crime
Ninad Vijayrao Deshmukh • HT Marathi
Nov 24, 2022 02:03 PM IST

Pune News Update : पुण्यात एका १३ वर्षाच्या मुलाने आपल्या वर्गातील १३ वर्षीय मुलीच्या नावे माझी बायको होशील का ? असे इंस्टाग्रामवर स्टेट्स ठेवल्याची बाब पुढे आली आहे. या प्रकरणी मुलीच्या आईने हडपर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे : मोबाइलमुळे आजची मुळे ही भरकट चालली आहे. अशीच एक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. हडपसर परीसरात एका नामवंत शाळेत शिकणाऱ्या एका १४ वर्षांच्या मुलाने
त्याच्या वर्गातील मुलीचा फोटो इंस्टाग्रामवरून काढून तिच्या नावाने माझ्याशी लग्न करशील का ? असे स्टेट्स ठेवल्याने खळबळ उडाली. हे स्टेट्स त्याने व्हायरल देखील केले. हा प्रकार मुलीच्या लक्षात आल्यावर तिने तिच्या आईकडे तक्रार केली. यानंतर मुलीच्या आईने थेट हडपसर पोलिस ठाण्यात जात मुलाविरोधात तक्रार दिल्यावर पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी अल्पवयीन मुलगा हा १४ वर्षांचा असून तो हडपसर येथील एका नामांकित शाळेत शिकतो. आरोपी मुलाने या मुलीकडे मैत्री करण्या संदर्भात अनेक वेळा मागणी केली. मात्र, मुलीने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. असे असतांनाही मुलाने मुलीला त्रास देणे सुरूच ठेवले. आरोपी मुलगा हा मुलीचा पाठलाग देखील करत होता. तसेच मैत्री करण्यासाठी तिला धमकी देखील देत होता. त्याने थेट तिला उचलून घेऊन जाईन असे धमकावले होते.

मात्र, मुलीने मुलाच्या धमक्यांना भीक घातली नाही. यामुळे राग आल्याने आरोपी मुलाने थेट मुलीचा फोटो तिच्या इंस्टाग्रामवरून डाऊनलोड करून माझी बायको होशील का ? लिहीत तो फोटो इंस्टाग्रामच्या स्टेटसवर ठेवला. हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. मुली पर्यन्त तो फोटो पोचल्यावर मुलीच्या सय्यम सुटला. तिने ही बाब तिच्या आईला सांगितली. मुलीच्या आईने देखील याची गंभीर दखल घेत थेट हडपसर पोलिस ठाणे गाठले. आणि या प्रकरणी तक्रार दिली. त्यानुसार मुलावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे यांनी दिली आहे.

संबंधित बातम्या