मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sharad Mohol Case : शरद मोहोळ हत्येप्रकरणी आणखी एकाला अटक, पोलिसांनी तपासल्या १९ हजार ऑडिओ क्लिप

Sharad Mohol Case : शरद मोहोळ हत्येप्रकरणी आणखी एकाला अटक, पोलिसांनी तपासल्या १९ हजार ऑडिओ क्लिप

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Feb 07, 2024 11:30 AM IST

Sharad Mohol Case : शरद मोहोळ खून प्रकरणी आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. दत्तवाडीत राहणाऱ्या अभिजीत अरुण मानकर याला अटक करण्यात आली आहे.

gangster sharad mohol murderer arrested
gangster sharad mohol murderer arrested

police arrested Abhijit Varun Mankar in Sharad Mohol murder Case : शरद मोहोळ खून प्रकरणात पोलिस अॅक्शन मोडमध्ये आहे. आता पर्यंत १६ गुंडांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात पाठलाग करून पोलिसांनी मुख्य आरोपी गणेश मारणे याला अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी तब्बल १९ हजार ऑडिओ क्लिप तपासत ५ हजार ऑडिओ क्लिप वेगळ्या केल्या यातील ६ संशयित ऑडिओ क्लिपवरुन आणखी एका आरोपीच्या मुसक्या मंगळवारी या खून प्रकरणी आवळण्यात आल्या आहेत.

Pune Crime : कुख्यात गुंडांना पुणे पोलिसांचा दणका! गजानन मारणे, निलेश घायवळसह ३०० अट्टल गुंडाची धिंड

अभिजीत वरुण मानकर (वय ३१) असे या आरोपीचे नव असून तो दत्तवाडी येथे राहतो. पोसिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेने तब्बल १९ हजार ऑडिओ क्लिप तपासल्या. त्यापैकी १० हजार ५०० ऑडिओ क्लिमधून ५ हजार ऑडिओ क्लिप वेगळ्या करण्यात आल्या. यातील ६ ऑडिओ क्लिप संशयास्पद आढळल्या. त्याच्या जोरावर तपासादरम्यान साहिल पोळेकर आणि नामदेव कानगुडे यांच्यातील संभाषणात अभिजित मानकरचे नाव या हत्येत पुढे असल्याचे आढळले. त्यानुसार मंगळवारी पोलिसांनी अभिजीत अरुण मानकरला सापळा रचून अटक केली. शरद मोहोळ हत्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आहे.

csmt station : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या टॉयलेट, बाधरूममधून १२ लाखांचे नळ, तोट्या लंपास

गेल्या महिन्यात ५ जानेवारी रोजी गुंड शरद मोहोळ याची हत्या करण्यात आली होती. शरद मोहोळ हा घरून मंदिरात जात असतांना त्याचे बॉडीगार्ड विठ्ठल गांडले, नितीन कानगुडे आणि साहील पोळेकर यांनीच त्याच्यावर गोळ्या झाडून त्याची हत्या केली. लग्नाचा वाढदिवशी त्याच्याअर हल्ला करून त्याची हत्या करण्यात आली होती. दोन गोळ्या शरद मोहोळच्या मानेत लागल्या तर एक छातीत लागली. तर एक गोळी ही डोक्यात लागली. त्याला दवाखान्यात भरती केले असता उपचार सुरू असतांना त्याचा मृत्यू झाला.

पुणे पोलिस आयुक्तालयात ३०० गुंडांची ओळख परेड

पुणे पोलिस आयुक्तालयाच्या आवारात मंगळवारी तब्बल २०० ते ३०० गुंडांना एका रांगेत उभे करण्यात आले होते. यात कुख्यात गुंड निलेश घायावळ, गजा मारणे यासह अनेक टोळ्या होत्या. तर दुसऱ्या रांगेत गुन्हेगारी क्षेत्रात नव्याने आलेले काही तरुण उभे करण्यात आले होते. दरम्यान, भविष्यात कुठलाही गुन्हा करायचा नाही. कुठल्याही गुन्ह्यात प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सहभागी व्हायचं नाही. इन्स्टाग्राम, व्हॉट्सअप यावर स्टेटस ठेऊन दादागिरी दाखवायची नाही, असे केल्यास गंभीर परिमाण होतील असा इशारा त्यांनी दिला.

WhatsApp channel