Dadar bomb Threat : दादर रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याच्या फोन कॉलमुळं मोठी खळबळ
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Dadar bomb Threat : दादर रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याच्या फोन कॉलमुळं मोठी खळबळ

Dadar bomb Threat : दादर रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याच्या फोन कॉलमुळं मोठी खळबळ

Updated Jul 18, 2023 10:54 AM IST

dadar railway station bomb threat : मुंबईतील रेल्वे स्टेशनमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आल्याने राजधानीत खळबळ उडाली आहे. त्यानंतर आता या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

dadar railway station bomb threat
dadar railway station bomb threat (PTI)

dadar railway station bomb threat : मुंबईतील दादर रेल्वे स्थानकात बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपीने दादर लोहमार्ग पोलिसांनी फोनवरून धमकी दिली असून त्यामुळं मुंबईत खळबळ उडाली आहे. त्यानंतर आता मुंबई पोलीस, लोहमार्ग पोलीस आणि बॉम्बशोधक व नाशक पथक दादर रेल्वे स्थानकावर दाखल झालं आहे. यंत्रणांची धावाधाव झाल्यानंतर दादर रेल्वे स्टेशनवर कोणतीही बॉम्बसदृश वस्तू आढळून आली नाही. त्यानंतर आता पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करत त्याला पुण्यातून बेड्या ठोकल्या आहे. योगेश शिवाजी ढेरे असं आरोपीचं नाव असून तो पुण्यातील गोखलेनगर परिसरात राहत होता.

आरोपी योगेश ढेरे याने मुंबईतील लोहमार्ग पोलिसांना फोन करून दादर रेल्वे स्थानकावर बॉम्ब ठेवल्याची धमकी दिली होती. त्यानंतर पुण्यातील पोलीस शिपाई प्रशांत सुतार यांनी लोणी काळभोर ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी ज्या क्रमांकावरून फोन करण्यात आला होता, त्याला ट्रेस करत माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. त्यावेळी पुण्यातील गोखलेनगर परिसरातून धमकीचा फोन करण्यात आल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. तसेच धमकीचा फोन योगेश ढेरे यांच्या नंबरवरून करण्यात आल्याचं पोलिसांना समजलं. त्यानंतर पोलिसांनी तातडीने आरोपी योगेश ढेरे याला ताब्यात घेत त्याची चौकशी सुरू केली आहे.

दादर रेल्वे स्थानकात बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळताच पोलिसांनी अनेक प्लॅटफॉर्म्स रिकामे करण्यास सुरुवात केली होती. पोलिसांचा तसेच बॉम्बशोधक व नाशक पथकाचा फौजफाटा रेल्वे स्टेशनवर दाखल झाल्याने प्रवाशांची चांगलीच धावपळ उडाली. परंतु त्यावेळी स्टेशनवर कोणतीही बॉम्बसदृश्य वस्तू आढळून आली नाही. त्यामुळं पोलिसांसह प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. पुणे पोलिसांनी आरोपी योगेश ढेरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याची चौकशी केली जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक खैरनार हे करत आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या