धक्कादायक! पुण्यात ८५ वर्षांच्या वृद्ध महिलेवर २३ वर्षीय तरुणाचा अत्याचार, ठार मारण्याचाही प्रयत्न-pune police arrested 23 year old youth for rape and murder attempt of 85 year old women ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  धक्कादायक! पुण्यात ८५ वर्षांच्या वृद्ध महिलेवर २३ वर्षीय तरुणाचा अत्याचार, ठार मारण्याचाही प्रयत्न

धक्कादायक! पुण्यात ८५ वर्षांच्या वृद्ध महिलेवर २३ वर्षीय तरुणाचा अत्याचार, ठार मारण्याचाही प्रयत्न

Sep 25, 2024 05:26 PM IST

Pune Crime news : पुण्यात डोकं बधीर करणारी घटना घडली आहे. इथं एका २३ वर्षीय तरुणानं ८५ वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याचं समोर आलं आहे.

Pune Rape : पुण्यातील म्हाळुंगे इथं ८५ वर्षांच्या वृद्ध महिलेवर २३ वर्षीय तरुणाचा अत्याचार
Pune Rape : पुण्यातील म्हाळुंगे इथं ८५ वर्षांच्या वृद्ध महिलेवर २३ वर्षीय तरुणाचा अत्याचार

एका २३ वर्षीय तरुणानं ८५ वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार करून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना पुण्यात इथं घडली आहे. डोकं बधीर करणाऱ्या या घटनेतील आरोपीला अटक करण्यात आली आहे.

पीडित वृद्धेच्या मुलीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याला हिंजवडीतून अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, २२ सप्टेंबर रोजी संध्याकाळी साडेसहा ते सव्वासातच्या दरम्यान पीडित वृद्धा फ्लॅटच्या समोरील मोकळ्या जागेत फेऱ्या मारत होती. त्याचवेळी निळसर रंगाचा चौकड्याचा शर्ट घातलेल्या इलेक्ट्रेशियनचं काम करणाऱ्या इसमानं वृद्ध महिलेचे पाठीमागून तोंड दाबले व सर्व्हिस लिफ्टच्या जिन्यातून ओढत फरफटत ६ व ७ व्या मजल्याच्या जिन्यामध्ये नेले. तिथं त्यानं वृद्ध महिलेला मारहाण करून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर गळा दाबून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला.

अत्याचार व मारहाणीमुळं ही वृद्ध महिला बेशुद्ध पडली. त्यानंतर आरोपी तिथून फरार झाला. वृद्ध महिला घरी न परतल्यानं तिच्या कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली असता ती इमारतीच्या जिन्यात बेशुद्धावस्थेत आढळली. नातेवाईकांनी तिला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. तिची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं समजतं.

ओम जयचंद पुरी असं आरोपीचं नाव आहे. तो हिंजवडी येथील साखरेवस्तीत राहायला होता. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीनं आरोपीचा माग काढला व त्याला अटक केली. त्याच्यावर बलात्कार, गंभीर दुखापत करणं व खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकशीत आरोपीनं गुन्ह्याची कबुली दिली आहे.

मूळचा धाराशिव जिल्ह्यातील असलेला आरोपीन याआधी याच सोसायटीत विजेचं काम केल्याचं समोर आलं आहे. हल्ल्याच्या दिवशी संध्याकाळी तो कामाच्या शोधात आला होता. वृद्ध महिलेला एकटीला पाहून त्यानं हे नीच कृत्य केलं. न्यायालयानं त्याला २७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास सुरू केला आहे.

महिला आणि बाल हेल्पलाइन क्रमांक

महिला हेल्पलाइन - १८१

महिला हेल्पलाइनसाठी राष्ट्रीय आयोग - ११२

राष्ट्रीय महिला आयोग हिंसेविरुद्ध हेल्पलाइन - ७८२७१७०१७०

पोलीस महिला आणि ज्येष्ठ नागरिक हेल्पलाइन - १०९१/१२९१.

चाइल्डलाइन इंडिया - १०९८

हरवलेली मुले आणि महिला - १०९४

Whats_app_banner
विभाग