काही दिवसांपूर्वी पुण्यात कोट्यवधी रुपयांच्या एमडी ड्रग्जचा साठा सापडला होता. पुण्यातील ड्रग्ज कनेक्शन दिल्ली सांगलीपर्यंत पोहोचले होते. पुण्यातील ड्रग्जची तस्करी दिल्लीमार्गे परदेशात पाठवला जात होता. राज्यात खळबळ माजवणाऱ्या या प्रकरणानंतर पुणे पोलिसांनी देशभरातील अनेक ठिकाणांवर छापेमारी केली.
पुणे पोलिसांनी सांगलीतही छापेमारी करत मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. या ड्रग्जचं तस्करीचं कनेक्शन आता कर्नाटकमध्ये पोहोचलं असून पुणे पोलिसांनी मोठी छापेमारी करून ड्रग्ज तस्कर पप्पू कुरेशीला अटक केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी संदीप धुनिया याचा पप्पू कुरेशी हा साथीदार आहे. पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला १९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात गुन्हे शाखेच्या पथकाने छापेमारी करून १०० कोटींपेक्षा अधिक अमली पदार्थ जप्त केले होते. ५२ किलो मेफेड्रॉनचा साठाही पोलिसांनी जप्त केला होता.
पुणे ड्रग्ज तस्तरी प्रकरणात धुनिया मुख्य आरोप आहे. तो कुरेशी आणि हैदर शेख या दोघांच्या मदतीने ड्रग्सची विक्री करत होता. पप्पू कुरेशी संदीप धुनियाच्या संपर्कात होता. पुण्यात काही ठिकाणी त्याने ड्रग्स आणि ड्रग्स बनवण्यात येणारी रसायने लपून ठेवल्याचा पोलिसांना संशय आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
पुणे पोलिसांनी दिल्लीत छापेमारी करत ४०० किलो अमली पदार्थ जप्त केले होते. या प्रकरणात ४००० हजार कोटीचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते.