Bopdev Ghat : बोपदेव घाट बलात्कार प्रकरणी पोलिसांनी तपासले तब्बल ३ हजार मोबाइल क्रमांक, २०० पेक्षा अधिक गुंडांची झडती
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Bopdev Ghat : बोपदेव घाट बलात्कार प्रकरणी पोलिसांनी तपासले तब्बल ३ हजार मोबाइल क्रमांक, २०० पेक्षा अधिक गुंडांची झडती

Bopdev Ghat : बोपदेव घाट बलात्कार प्रकरणी पोलिसांनी तपासले तब्बल ३ हजार मोबाइल क्रमांक, २०० पेक्षा अधिक गुंडांची झडती

Published Oct 06, 2024 02:11 PM IST

Bopdev Ghat rape : नराधम आरोपींकडे कोयता, चाकू अशी शस्त्रे होती, तसेच एका आरोपीच्या हातात बांबू होता. मित्राला ठार मारण्याची धमकी देऊन आरोपींनी तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याची माहिती समोर आली आहे.

बोपदेव घाट बलात्कार प्रकरणी पोलिसांनी तपासले तब्बल ३ हजार मोबाइल क्रमांक, २०० पेक्षा अधिक गुंडांची झडती
बोपदेव घाट बलात्कार प्रकरणी पोलिसांनी तपासले तब्बल ३ हजार मोबाइल क्रमांक, २०० पेक्षा अधिक गुंडांची झडती

Bopdev Ghat rape : पुण्यात बोपदेव घाटात मित्रासोबत गुरुवारी रात्री ११ वाजता टेबल पॉइंट फिरण्यासाठी गेलेल्या तरुणीवर तिघा नराधमांनी बलात्कार केल्याने खळबळ उडाली होती. आरोपींनी दोघांना कोयत्याचा आणि चाकूचा धाक दाखवला व त्यांच्या जवळील वस्तु लुटल्या. त्यानंतर तरुणाला बांधून तरुणीला दुसरीकडेनेत तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपींचे स्केच तयार केले आहे. तसेच आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तीन दिवसांत तब्बल ३ हजार मोबाइल क्रमांक तपासले आहेत. या सर्व फोन कॉल्सची तांत्रिक माहिती घेतली जात आहे. या सोबतच पोलिसांनी २०० पेक्षा अधिक सराईत गुन्हेगारांची देखील चौकशी केली आहे.

बोपदेव घाट परिसरात झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणाला तीन दिवस उलटले आहेत. असे असले तरी अद्याप पोलिसांना आरोपींचा शोध लागलेला नाही. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक दिवसरात्र एक करत आहेत. त्यांनी आता पर्यंत बोपदेव घाटमार्गे गेलेल्या तीन हजार मोबाइल क्रमांकाची तपासणी केली आहे. तसेच मिळालेल्या माहितीचे तांत्रिक विश्लेषण पोलिसांनी सुरू केले आहे. तसेच तब्बल ७० ते ८० किमी पर्यंतचे सीसीटीव्ही देखील तपासले जात असल्याची, माहिती परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त आर. राजा यांनी दिली.

पोलिसांकडून स्केच प्रसिद्ध

या पूर्वी पोलिसांनी पीडितेने दिलेल्या वर्णनानुसार आरोपीचे स्केच तयार केले आहे. हे स्केच कोंढवा पोलिसांनी प्रसिद्ध केले आहे. तसेच या आरोपींची माहिती असल्यास पोलिसांची संपर्क साधण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.

संशयित आरोपी सीसीटीव्हीत कैद ? 

शहर पोलिसांचे तब्बल २५ पथक आरोपींच्या मागावर आहे. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण करून तपास सुरू आहे. दरम्यान, बोपदेव घाटाच्या सासवडच्या बाजूला तीन संशयिताच एक सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले असून पोलिस त्या दृष्टीने तपास करत आहेत.

काय झाली होती घटना ?

गुरुवारी रात्री ११ वाजता एक तरुणी तिच्या मित्रा सोबत ही बोपदेव घाटातील टेबल पाॅईंट परिसरात फिरायला गेले होते. यावेळी आरोपी त्या ठिकाणी आले. त्यांनी इथे एकते काय करत आहात असा सवाल तरुणी आणि तिच्या मित्राला केला. त्यांच्या हातात कोयता आणि चाकू होते. त्यांनी तरुणी आणि तिच्या मित्राला कोयत्याचा धाक दाखवत तिच्या मित्राला मारहाण करुन त्याचा शर्ट काढला. 

तसेच त्यांच्या जवळील मौल्यवान वस्तु देखील काढून घेतल्या. मुलाचे हात पाय शर्टने बांधले व त्याच्या पॅन्टचा पट्टा काढून त्याचे पाय बांधले. यानंतर त्याला एका झाडाला बांधून आरोपींनी तरुणीवर सामूहिक बलात्कार केला. तरुणीला तिच्या मित्राला ठार मारण्याची धमकी देत आरोपींनी तरुणीवर सामूहिक बलात्कार केला.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर