मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune news : नियम म्हणजे नियम! पुण्यात आता पब, बार, रेस्टॉरंट रात्री दीड वाजेपर्यंतच सुरू ठेवता येणार

Pune news : नियम म्हणजे नियम! पुण्यात आता पब, बार, रेस्टॉरंट रात्री दीड वाजेपर्यंतच सुरू ठेवता येणार

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Feb 20, 2024 11:25 AM IST

new rules for hotel in pune : पुण्यातील हॉटेल, बार, रेस्टॉरंटसाठी नवी नियमावली पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी काढली असून रात्री दीड वाजेपर्यंत हॉटेल, बार आणि पब सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

new rules for hotel in pune
new rules for hotel in pune

Pune police new rules for hotel, bar and pubs: पुण्यात मोठ्या प्रमाणात तरुणाई आहे. ही तरुणाई मोठ्या प्रमाणात हॉटेल, बार आणि पबमध्ये जाऊन धांगड-धिंगाणा घालत असते. दरम्यान, हे बार आणि पब पहाटे पाच पर्यंत सुरू ठेवत होते. त्यांच्यावर कोणतेही निर्बंध नव्हते. शिवाय पोलिसांना चिरीमिरी देऊन देखील रात्री उशिरा पर्यंत हे हॉटेल सुरू ठेवले जात होते. यामुळे आत अशा हॉटेल, बार, आणि पबसाठी पुण्याचे नवनियुक्त पोलिस आयुक्त अमितेश कुमार आणि नवी नियमावली जाहीर केली आहे. या पुढे पुण्यातील तरुणांचा रात्रीचा धिंगणा थांबवण्यासाठी शहरातील हॉटेल आणि पब हे मध्यरात्री दीड वाजेपर्यंत ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. जर या नियमावलीचे पालन केले नाही तर संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत.

Onion Price News : सरकारनं एक घोषणा काय केली, कांद्याचा भाव ४० टक्क्यांनी वाढला

पुण्यात मोठ्या प्रमाणात हॉटेल, पब, बार आणि रेस्टॉरंट आहेत. या ठिकाणी रात्रीच्या वेळी तरुणाई जात असून डिजेच्या तालावर मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घालत असतात. दरम्यान, रात्री दीड पर्यंत हे हॉटेल सुरू ठेवण्याची परवानगी असताना हे आदेश धुडकावून पहाटे पर्यंत हॉटेल, पब, बार सुरू राहत होते. यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. काही बार आणि पबमध्ये गैर प्रकार झाल्याचे देखील उघड झाले होते. यामुळे हॉटेल व्यावसायिकांवर कुणाचा धाक नसल्याचे उघड झाले होते. नवनियुक्त पोलिस आयुक्त या संदर्भात काय भूमिका घेणार असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी पुण्यातील हॉटेल, बार, पबसाठी नवी नियमावली जाहीर केली आहे.

महाराष्ट्रात 'या' चार वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांना लढवायचीय लोकसभा निवडणूक

पोलिसांनी जाहीर केलेल्या नव्या नियमावली नुसार हॉटेलमध्ये बाहेरील कलाकार किंवा डीजे येणार असल्यास त्याची माहिती पोलिसांना देणे बंधनकारक करण्यात आले आहे. स्वच्छतागृह वगळून हॉटेलमध्ये सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. हॉटेलमध्ये प्रवेश करणाऱ्या तसेच बाहेर पडण्याच्या मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. सीसीटीव्ही चित्रीकरणातील डेटा साठविण्यासाठी दोन डीव्हीआर यंत्रे असावेत. हॉटेलमधील कर्मचारी, सुरक्षारक्षकांची चारित्र्यपडताळणी करावी. कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल असल्यास त्याला कामावर ठेवण्यासाठी पोलिस उपायुक्तांची परवानगी आवश्यक आहे. हॉटेलमध्ये धुम्रपानासाठी (स्मोकिंग झो) स्वतंत्र जागा असावी. दरम्यान, रात्री दीड पर्यंत हॉटेल सुरू ठेवावे, त्यानंतर जर हॉटेल, बार, पब सुरू असल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत.

लागू करण्यात आलेली ही नवी नियमावली १५ दिवसांसाठी लागू करण्यात आली असून यावर पुढील १५ दिवस नागरिकांच्या हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या आहेत. यानंतर त्यांचा अभ्यास करून पुन्हा एकदा नियमावली तयार केली जाणार आहे. पुण्यातील हुक्का पार्लरवरदेखील पुणे पोलिसांची नजर राहणार आहे.

IPL_Entry_Point

विभाग