Pimpri-Chinchwad Crime : पिंपरी-चिंचवड येथे एक धक्कादायक घटना उघकडीस आली आहे. वडील आणि मुलीच्या नात्याला एकाने काळिमा फासली आहे. जन्मदात्या पित्यासहन पाच जणांनी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. १३ वर्षीय पीडितेनं दिलेल्या तक्रारी नंतर वाडीलांसह शिक्षिकेच्या पतीने व आईच्या मैत्रिणीच्या पतीने व दिर अशा पाच जणांना चिखली पोलिसांनी अटक केली आहे. आत्याचाराची ही घटना ८ एप्रिल ते २९जून २०२४ या कालावधीत घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोशल मीडियावरील व्हिडीओप्रमाणे शरीरसंबंध करू, असे म्हणून एकाने १३ वर्षीय मुलीवर अत्याचार केला. त्यानंतर तिच्या शिक्षिकेच्या पतीने व आईच्या मैत्रिणीच्या पतीने व दिराने, व जन्मदात्या पित्याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. यामुळे त्रस्त झालेल्या मुलीने चिखली पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यावर प्रकार उघडकीस आला आहे.
समाधान लवटे (वय ४०), प्रताप धायतडे, नितीन हराळे (वय ३२), सागर हराळे (वय २०) आणि पीडित मुलीचा पित्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पोलिस कोठडीत आहेत.
या घटनेची हकीकत अशी की, पीडित मुलगी युट्यूबवर व्हिडिओ पाहत होती. यावेळी आरोपी समाधाव लवटे हा तिथे आला. यावेळी त्याने पीडितेला या व्हिडिओप्रमाणेच तुझ्यासोबत करेल. यानंतर त्याने मुलीला घरी नेऊन तिच्यावर अत्याचार केला. ही घटना पीडित मुलीने वडिलांना सांगितली. मात्र, वडिलांनी तिला आपली बदनामी होईल असे सांगून हा प्रकार कुणाला सांगू नको असे सांगितले. वडिलांच्या म्हणण्याप्रमाणे मुलीने हा प्रकार कुणाला सांगितला नाही. काही दिवसांनी ती आजारी पडली.
ती घरात झोपली असताना तिच्या वडिलांनीच येऊन तीच्यावर बलात्कार केला. तसेच हा प्रकार कुणाला सांगितल्यास तिला जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर देखील तिच्यावरील आत्याचाराची मालिका थांबली नाही. पीडित मुलगी ही शिकवणीसाठी गेली असता, तिच्या शिक्षिकेच्या पतीने तिच्यावर अत्याचार केले. यानंतर ती आपल्या आईच्या मैत्रिणीच्या घरी गेली असता तिच्या पतीने देखील तिच्यावर अत्याचार केले. यानंतर महिलेच्या दिरानेही मला तू खूप आवडतेस, मी तुझ्याशी लग्न करेल, असं म्हणत मुलीवर बलात्कार केला. २९ जूनच्या रात्री पुन्हा वडिलांनी तिच्यावर अत्याचार केले. या प्रकाराला कंटाळलेल्या पीडितेने पोलिसात धाव घेत या विरोधात तक्रार दिली. यावरुन पीडितेचे वडील, समाधान लवटे, प्रताप धायतडे, नितीन हराळे, सागर हराळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना अटक करण्यात आली आहे.
संबंधित बातम्या