Pune Coffee Shop: पुण्यात कॉफी शॉपच्या नावाखाली भलताच प्रकार, तरुण- तरुणीला 'अशा' अवस्थेत पाहून पोलीस चक्रावले
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Coffee Shop: पुण्यात कॉफी शॉपच्या नावाखाली भलताच प्रकार, तरुण- तरुणीला 'अशा' अवस्थेत पाहून पोलीस चक्रावले

Pune Coffee Shop: पुण्यात कॉफी शॉपच्या नावाखाली भलताच प्रकार, तरुण- तरुणीला 'अशा' अवस्थेत पाहून पोलीस चक्रावले

Published Aug 16, 2024 10:43 AM IST

Pune News: पुण्यातील कॉफीच्या नावाखाली भलताच प्रकार सुरु असल्याची माहिती मिळताच पोलीसही हादरून गेले.

पुण्यात कॉफी शॉपच्या नावाखाली अश्लील प्रकार
पुण्यात कॉफी शॉपच्या नावाखाली अश्लील प्रकार

Pune Police: पिंपरी चिंचवड येथील कॉफी शॉपच्या नावाखाली गैरप्रकार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी कॉफी शॉपवर छाप टाकली असता अनेक महाविद्यालयीन तरुण- तरुणी नको त्या अवस्थेत आढळून आली. या कॉफी शॉपमध्ये ग्राहकांना लॉजसारखे वेगळे कंपार्टमेंट तयार करण्यात आले होते, जिथे त्यांच्याकडून काही तासांसाठी तासाप्रमाणे पैसे आकरले जात असल्याची माहिती समोर आली.

छावा मराठा युवा महासंघाचे धनाजी येळकर पाटील यांनी पिंपरी चिंचवड शहरात कॉफी शॉपच्या नावाखाली भलताच प्रकार सुरू असल्याची तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी शहरातील सात कॉफी शॉपवर धाड टाकली, जिथे त्यांना महाविद्यालयीन तरुण-तरुणी नको त्या अवस्थेत आढळली. याप्रकरणी पोलिसांनी कॉफी शॉप मालकाविरोधात गुन्हा दाखल करून पुढील कारवाईला सुरुवात केली आहे. तसेच अश्लील कृत्य करणाऱ्या प्रेमीयुगुलांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कॉफी शॉप मालक अशा जोडप्यांकडून प्रत्येक तासाला २०० ते ५०० रुपये शुल्क आकरत असल्याचे समजत आहे.

पुणे: चतुःश्रृंगीतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, ११ महिलांची सुटका

जानेवारी महिन्यात चतुःश्रृंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा कक्षाने बुधवारी रात्री केला. बालेवाडी व पॅनकार्ड क्लब रोड येथील एका खासगी हॉटेलवर छापा टाकून पोलिसांनी अकरा महिलांची सुटका केली. रॉकी कदम, राहुल मदन ऊर्फ मदन संन्यासी, दिनेश ऊर्फ मामा, नवीन आणि रोशन अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, हे रॅकेट ऑनलाइन प्लॅटफॉर्म आणि व्हॉट्सअॅप नंबरच्या माध्यमातून काम करत होते. याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.डीसीपी (क्राइम) अमोल झेंडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, सोशल मीडिया आणि इंटरनेटच्या माध्यमातून सुरू असलेल्या सेक्स रॅकेटवर गुन्हे शाखा बारीक लक्ष ठेवून आहे.

पुणे: विमाननगरमधील वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश; तिघांची सुटका

जानेवारी महिन्यात पुणे शहरातील अवैध वेश्या व्यवसायाविरोधात मोठी कारवाई केली. पोलिसांनी एका हॉटेलमधून राजस्थानी अभिनेत्री आणि दोन उझबेक मुलींची सुटका केली. विमाननगर परिसरातील एका नामांकित हॉटेलमधून अवैध वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पुणे शहर पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा कक्षाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून हॉटेल परिसरात छापा टाकला आहे.बनावट ग्राहक असल्याचे भासवून पोलिसांनी व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून एजंटशी संपर्क सुरू केला असता ताशी १५ हजार रुपये दराने ही सेवा दिली जात असल्याचे त्यांना समजले. यानंतर पोलिसांनी सापळा रचून प्रसिद्ध राजस्थानी अभिनेत्री आणि दोन उझबेक मुलींची सुटका केली. याप्रकरणी विमाननगर पोलिस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये (आयटीपीए) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर