Pune news : पुण्यात पिंपळे गुरव येथे भरधाव कारने दुचाकीस्वाराला चिरडले! अपघाताचा भयंकर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल-pune pimple gurav drunk and drive case car hits twowheeler in pimpri chinchwad incident was caught in cctv ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune news : पुण्यात पिंपळे गुरव येथे भरधाव कारने दुचाकीस्वाराला चिरडले! अपघाताचा भयंकर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Pune news : पुण्यात पिंपळे गुरव येथे भरधाव कारने दुचाकीस्वाराला चिरडले! अपघाताचा भयंकर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Aug 09, 2024 03:58 PM IST

Pune news : पुण्यातील पिंपरी गुरव येथे एका भरधाव मोटारीने एका दुचाकी चालकाला धडक दिली. अपघातानंतर गाडी रस्त्यावर न थांबवता आरोपींनी दुचाकीला फरफटत नेले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

पुण्यात पिंपळे गुरव येथे भरधाव कारने दुचाकीस्वाराला चिरडले! अपघाताचा भयंकर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
पुण्यात पिंपळे गुरव येथे भरधाव कारने दुचाकीस्वाराला चिरडले! अपघाताचा भयंकर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Pune pimple gurav drunk and drive : पिंपळे गुरव मेन बस स्टॉप येथे एका भरधावर मोटरीने दुचाकीस्वारास चिरडल्याची घटना घडली आहे. ही घटना बुधवारी दुपारी १२ च्या दरम्यान घडली असून ती सीसीटीव्हीत कैद झाली आहे. चारचाकीचा चालक हा मद्यधुंद असल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शीनी नागरिकांनी केला आहे. पोलिसांनी कारचालकाला अटक केली होती. मात्र, कुणी तक्रार दिली नसल्याने पोलिसांनी आरोपींना सोडून दिले.

पुण्यात गेल्या काही दिवसांपासून दारू पिऊन गाडी चलवल्याने अपघात वाढले आहे. पोलिसांनी अनेक कारवाया करून देखील या घटना थांबलेल्या नाहीत. रोज किंवा दिवसाआड या घटना सातत्याने घडत आहेत. अशीच एक घटना पुण्यातील पिंपरीचिंचवड परिसरातील पिंपळे गुरव परिसरात घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. एक भरधाव मोटार वेगाने येत असून तिने एका दुचाकीला धडक दिली आहे. यानंतर चालकाने गाडी न थांबवता दुचाकी फरफटत नेली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही घटना ७ ऑगस्ट रोजी दुपारी १२ च्या सुमारास घडली. या घटनेनंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर दाखल झाला असून या व्हिडिओची दखल घेत पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत. या प्रकरणी कुणी तक्रार न केल्याने कार चालकाला सांगवी पोलिसांनी सोडून दिले. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे गुरव भागात ७ ऑगस्ट रोजी दुपारी १२ च्या दरम्यान घडली. गाडी रस्त्यावर घासत गेल्याने रस्त्यावर मोठा आवाज झाला. यामुळे नागरिक घाबरले, चारचाकी चालकाने दुचाकीसह चालकाला काही फूट अंतरावर फरफट घेऊन गेल्याचे सीसीटीव्हीत दिसत आहे. या घटनेत दुचाकी चालकासह इतर एक जण जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

तक्रार नसल्याने आरोपीला सोडले

घटनेच्या दिवशी झालेल्या अपघात कार चालकाविरोधात तक्रार नसल्याने ताब्यात घेतलेल्या कारचालकाला सांगवी पोलिसांनी सोडून दिले आहे. मात्र, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर या प्रकरणी पुन्हा आरोपीचा शोध घेतला जात आहे.

विभाग