Pune News : मतदान करा अन् ५० रुपयांचे पेट्रोल मोफत मिळवा! पुण्यात पेट्रोल डिलर्स असोसिएशन अनोखा उपक्रम
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune News : मतदान करा अन् ५० रुपयांचे पेट्रोल मोफत मिळवा! पुण्यात पेट्रोल डिलर्स असोसिएशन अनोखा उपक्रम

Pune News : मतदान करा अन् ५० रुपयांचे पेट्रोल मोफत मिळवा! पुण्यात पेट्रोल डिलर्स असोसिएशन अनोखा उपक्रम

Apr 29, 2024 10:51 AM IST

vote kar punekar campaign : पुण्यात १३ तारखेला लोकसभेसाठी मतदान होत आहे. या दिवशी मतदानाचा टक्का वाढवा यासाठी पुणे पेट्रोल डिलर्स असोसिएशने या साठी व्होट कार पुणेकर मोहीम हाती घेतली आहे.

मतदान करा अन् ५० रुपयांचे पेट्रोल मोफत मिळवा! पुण्यात पेट्रोल डिलर्स असोसिएशन अनोखा उपक्रम
मतदान करा अन् ५० रुपयांचे पेट्रोल मोफत मिळवा! पुण्यात पेट्रोल डिलर्स असोसिएशन अनोखा उपक्रम

vote kar punekar campaign : देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. राज्यातील विदर्भातील दोन टप्प्यातील मतदान झाले आहे. या निवडणुकीत मतदानाचा टक्का घटला आहे. पुण्यात १३ मे रोजी पुणे लोकसभा मतदार संघासाठी मतदान होणार आहे. मतदानाचा टक्का वाढवा यासाठी निवडणूक आयोगातर्फे विविध कार्यकम हाती घेतले जात आहे. अशातच मतदान वाढावे यासाठी पुणे पेट्रोल डिलर्स असोसिएशने देखील ‘व्होट कर पुणेकर’ ही मोहीम हाती घेतली असून मतदान करणाऱ्यांना ५० रुपयांचे पेट्रोल फुकट दिले जाणार आहे.

MDH spices issue : एमडीएचच्या मसाल्यात आढळला टायफॉइडचा बॅक्टेरिया! अमेरिकेने रोखला आयात होणारा माल

पुणे : लोकसभा निवडणुकीत मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी सरकारकडून विविध मोहिमा राबविल्या जात आहेत. आता पुणे पेट्रोल डिलर्स असोसिएशने यासाठी ‘व्होट कर पुणेकर’ मोहीम हाती घेतली आहे.

पुण्यात निवडणुकीत मतदान वाढावे यासाठी विविध योजना राबवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. याच मोहिमेला जोड म्हणून पेट्रोल डिलर्स असोसिएशन पुणेने देखील महा एनजीओ फेडरेशन व इतर स्वयंसेवी संस्थांसोबत ‘व्होट कर पुणेकर’ ही मोहीम सुरू केली आहे. असोसिएशनचे अध्यक्ष ध्रुव रुपारेल म्हणाले यांनी या संदर्भात माहिती देतांना संगितले की, आर्ट ऑफ लिव्हिंग आणि अनेक स्वयंसेवी संस्थांनी मतदार जागृतीसाठी उपक्रम हटी घेतले आहे. या प्रकारची मोहीम आम्ही देखील राबवावी असे आवाहन करण्यात आले होते. याला आम्ही प्रतिसाद दिला असून व्होट कार पुणेकर ही मोहीम सुरू केली आहे. त्यानुसार पुण्यातील पेट्रोल पंपचालक मतदान करणाऱ्या नागरिकांना बोटावरील शाई दाखविल्यानंतर एक लिटर ऑईल खरेदीवर त्यांना ५० रुपयांचे पेट्रोल मोफत देणार आहे. आमची ही मोहीम २० मेपर्यंत सुरू असणार असल्याचे रुपारेल म्हणाले.

Viral video : रीलवर कमेंट! भर रस्त्यावर चौघींचा राडा; एकमेकींना फ्री स्टाईल हाणामारी करत घातल्या लाथा, बुक्क्या

याचबरोबर असोसिएशनचे पदाधिकारी आणि काही कार्यकर्ते हे घरोघरी जाऊन मतदारांमध्ये मतदान करण्यासाठी जनजागृती व आवाहन करणार आहेत. मतदान वाढावे तसेच ज्येष्ठ नागरिकांना त्रास होऊ नये आणि मतदान केंद्रापर्यंत योग्यरित्या जाता येईल यासाठी मदत देखील केली जाणार आहे. मतदानादिवशी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना खाण्याचे आणि पाण्याच्या बाटल्यांचे देखील वितरण केले जाणार आहे.

या योजनेसाठी ‘व्होट कर पुणेकर’ मोबाईल उपयोजना तसेच http://www.votekarpunekar.com हे संकेतस्थळ देखील सुरू करण्यात आले आहे. यावर या मोहिमेची माहिती देण्यात आली आहे. तसेच मतदार आपले मतदान केंद्र देखील या संकेतस्थळावर शोधू शकणार आहेत. यावर क्यूआर कोड स्कॅन करूनही मतदान केंद्राचा शोध घेऊ मतदार घेऊ शकणार आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर