पुणे- पंढरपूर मार्गावर माळशिरस येथे टेम्पो-कारचा भीषण अपघात! कास पठार फिरण्यासाठी गेलेल्या चौघांचा जागीच मृत्यू
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  पुणे- पंढरपूर मार्गावर माळशिरस येथे टेम्पो-कारचा भीषण अपघात! कास पठार फिरण्यासाठी गेलेल्या चौघांचा जागीच मृत्यू

पुणे- पंढरपूर मार्गावर माळशिरस येथे टेम्पो-कारचा भीषण अपघात! कास पठार फिरण्यासाठी गेलेल्या चौघांचा जागीच मृत्यू

Oct 06, 2024 02:35 PM IST

Pune- Pandharpur highway Accident : कास पठार फिरण्यासाठी गलेल्या चौघांवर काळाने घाला घातला आहे. भरधाव टेम्पोने कारला दिलेल्या धडकेत हे चौघे ठार झाले आहेत. ही घटना पुणे - पंढरपूर मार्गावर कारूंडे (ता.माळशिरस) येथील पुलावर घडली.

पुणे- पंढरपूर मार्गावर माळशिरस येथे टेम्पो-कारचा भीषण अपघात! कास पठार फिरण्यासाठी गेलेल्या चौघांचा जागीच मृत्यू
पुणे- पंढरपूर मार्गावर माळशिरस येथे टेम्पो-कारचा भीषण अपघात! कास पठार फिरण्यासाठी गेलेल्या चौघांचा जागीच मृत्यू

Pune- Pandharpur highway Accident : कास पठार फिरण्यासाठी गलेल्या चौघांवर काळाने घाला घातला आहे. भरधाव टेम्पोने कारला दिलेल्या धडकेत हे चौघे ठार झाले आहेत. तर तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना पुणे - पंढरपूर मार्गावर लासूर्णे येथून २० किमी अंतरावर असणाऱ्या कारूंडे (ता.माळशिरस) येथील पुलावर आज रविवारी सकाळी ८ च्या सुमारास घडली. या अपघातात दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघातात राजेश अनिल शहा (वय ५५), दूर्गेस शंकर घोरपडे (वय २८), कोमल विशाल काळे (वय ३२), शिवराज विशाल काळे (वय १०) यांचा जागीच मृत्यू झाल. तर आकाश लोंढे (वय २५), पल्लवी बसवेश्वर पाटील (वय ३०), अश्वीनी दूर्गेश घोरपडे हे तिघे जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटणस्थळाचा पंचनामा केला असून जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या घटनेचे वृत्त असे की, लासूर्णे (ता.इंदापूर ) येथील राजेश शहा हे त्यांच्या कामगारांना घेऊन सातारा येथील कासपठार फिरण्यासाठी गेले होते. यावेळी नातेपुते येथून ते राँग साईडने पुढे निघाले होते. त्यांची गाडी सकाळी ८ च्या दरम्यान, लासूर्णे पासून २० किमी अंतरावर असणाऱ्या कारूंडे (ता.माळशिरस) येथील पुलावर आली. यावेळी समोरून येणाऱ्या भरधाव टेम्पोने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला. तसेच गाडीतील चौघांचा जागीच मृत्यू झाला. तर तिघे जण जखमी झाले.

यवतमाळमध्ये ड्रंक अँड ड्राइव्हमुळे आजोबा, नातू ठार

यवतमाळच्या जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील नागपूर-तुळजापूर महामार्गावर नांदगव्हाण येथे ड्रंक अँड ड्राईव्हमुळे आजोबा व नातवाचा मृत्यू झाला. दारू पिऊन ट्रक चालवत चालकाने दुचाकीवरून जाणाऱ्या आजोबा व नातवाला जोरदार धडक दिली. यात दोघांचा मृत्यू झाला. रमनिकभाई पटेल (वय ६५) असे आजोबाचे तर केतव राजेश पटेल (वय १९) असे मृत नातवाचे नाव आहे. महेंद्र नथूजी बागडे (वय ५६) असे आरोपी ट्रक चालकाचे नाव आहे. त्याचा पाठलाग करून पोलिसांनी अटक केली आहे.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर