baby canal accident news : उरुळी कांचन - जेजुरी हायवेवरील बेबी कालव्यात मोटार कोसळून एक ठार, तीन जखमी
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  baby canal accident news : उरुळी कांचन - जेजुरी हायवेवरील बेबी कालव्यात मोटार कोसळून एक ठार, तीन जखमी

baby canal accident news : उरुळी कांचन - जेजुरी हायवेवरील बेबी कालव्यात मोटार कोसळून एक ठार, तीन जखमी

May 23, 2024 12:09 PM IST

Uruli kanchan baby canal : पुण्यात उरुळी कांचन-जेजुरी महामार्गावरील बेबी कालव्यात कार कोसळून मोठा अपघात झाला आहे. त्यात एक जण ठार तर तिघे जखमी झाले आहेत.

उरुळी कांचन - जेजुरी हायवेवरील बेबी कालव्यात मोटार कोसळून एक ठार, तीन जखमी
उरुळी कांचन - जेजुरी हायवेवरील बेबी कालव्यात मोटार कोसळून एक ठार, तीन जखमी

uruli kanchan accident : गेल्या काही दिवसांपासून राज्यात अपघाताच्या अनेक घटना घडत आहेत. उजनी धरणात बोट उलटून सहा जण बुडाल्याची घटना ताजी असतानाच आता हवेली तालुक्यातून अपघाताची बातमी समोर आली आहे. उरुळी कांचन - जेजुरी महामार्गावरील शिंदवणे (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत नवीन बेबी कालव्यात मोटार कोसळून एकाचा मृत्यू झाला आहे, तर तिघे जखमी झाले आहेत.

आज (२३ मे) सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अमर साहेबराव घाडगे (वय २८, रा. जुन्नर) असं अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीच नाव आहे. या अपघातात गणेश संजय थोरात (वय २२), शुभम शंकर इंगोले (वय २१, रा. दोघेही, केसनंद, वाघोली, ता. हवेली) व आदित्य महादेव तावरे (वय २०, रा. जुन्नर,) हे तिघे जखमी झाले आहेत.

हे चौघेजण बकऱ्या विकण्याचा व्यवसाय करतात. आज सकाळी फलटण इथं बाजार असल्यानं चौघेजण मोटारीतून निघाले होते. शिंदवणे येथील बेबी कालव्यावर आले असता अमरचे गाडीवरील नियंत्रण सुटले. मात्र कालव्याला संरक्षक कठडा नसल्यानं गाडी थेट कालव्यात कोसळली.

ग्रामस्थ वेळेवर धावले म्हणून…

गाडी कोसळल्याची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ धाव घेतली व मदतकार्य सुरू केलं. बऱ्याच प्रयत्नांनंतर लोकांनी चौघांनाही गाडीतून बाहेर काढलं. यामध्ये तिघेजण किरकोळ जखमी झाले आहेत. चालक अमर घाडगे याचा जागेवरच मृत्यू झाला. ग्रामस्थ वेळेवर पोहोचले नसते तर इतर तिघांचाही जीव संकटात सापडला असता. या प्रकरणी उरुळी कांचन पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर