पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीची आत्महत्या, अंगावरील मारहाणीच्या खुणांमुळे घातपाताचा संशय
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीची आत्महत्या, अंगावरील मारहाणीच्या खुणांमुळे घातपाताचा संशय

पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीची आत्महत्या, अंगावरील मारहाणीच्या खुणांमुळे घातपाताचा संशय

Published Apr 08, 2024 05:47 PM IST

Pune News : पुण्यात वसतीगृहात राहून स्पर्धा परीक्षेची तयारी (competitive exam) करणाऱ्या तरुणीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीची आत्महत्या
पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीची आत्महत्या

पुण्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. पुण्यात वसतीगृहात राहून स्पर्धा परीक्षेची तयारी (competitive exam) करणाऱ्या तरुणीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. वसतीगृहाच्या खोलीत गळफास घेऊन तिने आपले जीवन संपवले आहे. पुण्यातील गुरुवार पेठेत ही खळबळजनक घटना घडली. 

अभिलाषा मित्तल (वय २७) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे आहे. अभिलाषा मूळची वाशिम जिल्ह्यातील रहिवाशी आहे. गेल्या महिन्यापासून ती पुण्यात राहून स्पर्धा परीक्षांची तयारी करत होती. या प्रकरणी पुण्यातील खडक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मृत तरुणीच्या शरीरावर मारहाण झाल्याच्या खूना आढळल्याने घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. हत्या की आत्महत्या याचा पोलिसांकडून तपास केला जात आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार अभिलाषा मित्तल ही तरूणी वाशिमची असून गेल्याच महिन्यात ती पुण्यात आली होती. पुण्यात राहून ती स्पर्धा परीक्षांची तयारी करत होती. यासाठी तिने पुण्यातील गुरुवार पेठेतील एका मुलींच्या हॉस्टेलमध्ये खोली घेतली होती. 

होस्टेलमध्ये राहणाऱ्या अभिलाषाच्या मैत्रिणीने सांगितले की, अभिलाषा होस्टेलच्या खोलीत एकटीच होती. तिच्या खोलीचा दरवाजा आतून बंद होता. बराच वेळ झाला तरी ती बाहेर न आल्याने मैत्रिणीने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. खिडकीतून आत डोकाले असता अभिलाषा पंख्याला लटकलेली दिसली. 

मैत्रिणीने याची सूचना तत्काळ पोलिसांनी दिली. पोलीस घटनास्थली दाखल झाले व त्यांनी तपास सुरू केला. प्राथमिक तपासानुसार अभिलाषाच्या अंगावर मारहाणीच्या खुणा आढळल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांनी वेगळाच संशय व्यक्त केला आहे. पोलिसांनी अभिलाषाचे नातेवाईक व मैत्रिणींची चौकशी करत आहेत.

‘लव्ह जिहाद’चा आरोप पुणे विद्यापीठात तरुणाला मारहाण -

पुणे विद्यापीठात लव्ह जिहादचा आरोप करत एका तरुणाला मारहाण करण्यात आली. दुसऱ्या धर्मातील असणाऱ्या तरुणीशी मैत्री तोडावी या साठी ही मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणी विद्यापीठाच्या वसतिगृह प्रमुखांकडे लेखी तक्रार देण्यात आली असून या बाबत चतुशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी घडली.

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर