मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mohol On Ajit Pawar : पावसावरून रंगले ट्विटर ‘वॉर’.. मोहोळ यांचा अजित पवारांवर प्रश्नांचा भडीमार

Mohol On Ajit Pawar : पावसावरून रंगले ट्विटर ‘वॉर’.. मोहोळ यांचा अजित पवारांवर प्रश्नांचा भडीमार

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Oct 18, 2022 10:36 PM IST

muralidhar mohol on ajit pawar : पावसाने पुणे तुंबल्यानंतर यावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये कलगीतुरा रंगला आहे. शहरात निर्माण झालेल्या परिस्थितीवरुन आता माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात ट्विटर वॉर रंगले आहे.

मोहोळ यांचा अजित पवारांवर प्रश्नांचा भडीमार
मोहोळ यांचा अजित पवारांवर प्रश्नांचा भडीमार

पुणे – पुण्यात सोमवारी रात्री अभूतपूर्व पाऊस पडला. या पावसाने पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली. पुण्याचे रेल्वे स्टेशन, भुयारी मार्ग, दगडूशेट गणपती मंदिर व शहरातील सर्वच रस्त्यांवर पाणी साचले होते. पावसाने पुणे तुंबल्यानंतर यावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये कलगीतुरा रंगला आहे. शहरात निर्माण झालेल्या परिस्थितीवरुन आता माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात ट्विटर वॉर रंगले आहे.

पुण्यातील विकासकामांवरून अजित पवारांनी टीका केल्यानंतर मुरलीधर मोहोळ यांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करत पलटवार केला आहे. बांधलेले उड्डाणपूल का पाडावे लागले?, सार्वजनिक वाहतुकीचा बोजवारा का उडाला? अशा प्रकारचे प्रश्न विचारत मुरलीधर मोहोळ यांनी शहरातील रखडलेल्या कामांवरुन अजित पवार यांना जाब विचारला आहे.

स्मार्ट सिटीचं स्वप्न दाखवून भाजपनं पुणे शहराचं पार वाटोळं करून ठेवलं आहे, अशी टीका अजित पवारांनी ट्वीट करत भाजपवर केली होती. त्यावर मुरलीधर मोहोळांनी प्रश्न उपस्थित करत प्रत्युत्तर दिलं आहे.

बांधलेले उड्डाणपूल का पाडावे लागले?, आंबिल ओढा दुर्घटनेतील बळींना जबाबदार कोण?, PMPML का खिळखिळी झाली?, सार्वजनिक वाहतुकीचा बोजवारा का उडाला?, मेट्रो दहा वर्षें कागदावर कोणी ठेवली?, कचऱ्याची समस्या का झाली?, BRT बळींचं पाप कोणाचं? असे शहरातील विविध बाबींवर त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहे.

स्मार्ट सिटीचं स्वप्न दाखवून भाजपनं पुणे शहराचं पार वाटोळं करून ठेवलं आहे. काल सायंकाळी अतिवृष्टीमुळे भाजपशासित पुणे मनपानं पुण्यात काय दिवे लावलेत याची कल्पना येते. लोकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला आहे. मनपाला 'अव्यवस्थेची'कारणं काय आहेत ती सांगावीच लागतील, अशी टीका अजित पवारांनी ट्विटरवरुन केली होती.

WhatsApp channel