धक्कादायक.. रस्त्याला भगदाड पडल्यानं बघता-बघता पुणे महानगरपालिकेचा अख्खा ट्रकच खड्ड्यात गाडला! पाहा VIDEO-pune news pune entire truck of municipal corporation stuck into 40 ft pothole video goes viral ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  धक्कादायक.. रस्त्याला भगदाड पडल्यानं बघता-बघता पुणे महानगरपालिकेचा अख्खा ट्रकच खड्ड्यात गाडला! पाहा VIDEO

धक्कादायक.. रस्त्याला भगदाड पडल्यानं बघता-बघता पुणे महानगरपालिकेचा अख्खा ट्रकच खड्ड्यात गाडला! पाहा VIDEO

Sep 20, 2024 07:00 PM IST

Punenews : ट्रक मागे घेत असताना ४० ते ५०फूट खाली खड्ड्यात पडल्याने व पाहता पाहता संपूर्ण गाडला गेल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. ही घटना नेमकी कशामुळे घडली?असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

पुणे महानगरपालिकेचा अख्खा ट्रकच खड्ड्यात गाडला!
पुणे महानगरपालिकेचा अख्खा ट्रकच खड्ड्यात गाडला!

पुण्यातील रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेक अपघाताच्या घटना समोर आल्या आहेत. मात्र आज शहरातील समाधान चौक परिसरात अजब प्रकार घडला. सिटी पोस्ट इमारतीच्या आवारात भला मोठा खड्डा पडला होता. रस्त्यातच पडलेल्या भल्या मोठ्या भगदाडात अख्खा ट्रक गाडला गेला आहे. या ट्रकसह दोन दुचाकी देखील या खड्ड्यात कोसळल्याचे सांगितले जात आहे. ट्रक मागे घेत असताना पेव्हर ब्लॉक खचून ४० ते ५० फूट खोल खड्ड्यात हा ट्रक कोसळला. घटनेनंतर अग्निशामक दलाचे जवान तातडीने पोहोचले असून ट्रक बाहेर काढण्याचे शर्थीने प्रयत्न सुरु आहेत. या दुर्घटनेत कुठलीही जिवीतहानी झाली नसल्याची माहिती आहे. पण संबंधित घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

या घटनेचे दृश्य तेथे असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. सिटी पोस्ट इमारतीच्या आवारात ज्या ठिकाणी हा खड्डा पडला त्याच्या खाली मोठा नाला असल्याने ट्रक थेट नाल्यात गेला. मिळालेल्या माहितीनुसार पुणे महानगरपालिकेचा हा ट्रक काही सामान घेऊन समाधान चौकात आला होता. जिथे दुरुस्तीचं काम सुरू होतं. ट्रक जेव्हा तिथे आला त्यावेळी तेथील पेव्हर ब्लॉक खचले आणि संपूर्ण ट्रक खड्ड्यात गाडला गेला.

ट्रक मागे घेत असताना ४० ते ५० फूट खाली खड्ड्यात पडल्याने व पाहता पाहता संपूर्ण गाडला गेल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. ही घटना नेमकी कशामुळे घडली? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. ट्रक चालकाने प्रसंगावधान राखत ट्रकमधून बाहेर उडी मारल्याने त्याचा जीव वचावला आहे. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली आहे.

अग्निशमन दलाच्या जवानांकडून दोरखंडाच्या सहाय्याने ट्रक बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र खड्डा खूप खोल असल्याने व ट्रक पुरता अडकल्याने दोरखंडाने बाहेर काढणे, आव्हानात्मक बनले आहे. यामुळे जेसीबी बोलावण्यात आला असून जेसीबीच्या साहाय्याने ट्रक बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. इतका मोठा खड्डा शहरात यापूर्वी कोठेही पडला नसल्याचे सांगण्यात येत आहे.

Whats_app_banner
विभाग