मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sasoon Hospital : ससून रुग्णालयाच्या ICU मध्ये उंदीर चावल्याने रुग्णाचा मृत्यू, पुण्यातील धक्कादायक प्रकार

Sasoon Hospital : ससून रुग्णालयाच्या ICU मध्ये उंदीर चावल्याने रुग्णाचा मृत्यू, पुण्यातील धक्कादायक प्रकार

Apr 02, 2024 05:41 PM IST

Sassoon Hospital Pune : पुण्यातील ससून रुग्णालयातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आयसीयूमध्ये उपचार घेत असलेल्या ३० वर्षीय रुग्णाचा उंदीर चावल्याने मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

ससून रुग्णालयाच्या  ICU मध्ये उंदीर चावल्याने रुग्णाचा मृत्यू
ससून रुग्णालयाच्या ICU मध्ये उंदीर चावल्याने रुग्णाचा मृत्यू

नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणानं चर्चेत असलेलं पुण्यातील ससून रुग्णालय पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. आज ससून रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  ससूनमधील अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या तरुण रुग्णाचा उंदीर चावल्यामुळे मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनावर संताप व्यक्त केला आहे. सागर रेणूसे (वय ३०) असे उंदराने चावा घेतल्यानं मृत्यू झालेल्या रुग्णाचे नाव आहे. या प्रकारामुळे पुण्यात खळबळ माजली आहे.

सागरचा मृत्यू उंदीर चावल्याने झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. तसेच जोपर्यंत संबंधितांवर योग्य कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. नातेवाईकांनी ससून रुग्णालय प्रशासनावर उपचारात हलगर्जीपणा केल्याचा गंभीर आरोप केला आहे. मात्र रुग्णालयाने हा दावा फेटाळून लावला आहे. सागरचा मृत्यू झाल्यावर नातेवाईकांनी त्याला उंदीर चावल्याचा आरोप केला होता. मात्र डॉक्टरांनी त्याचा मृत्यू उंदीर चावल्यामुळे झाल्याच्या आरोपाला नकार दिला होता. मात्र त्यानंतर डॉक्टरांनी सागर रेणुसेच्या शरीरवर उंदीर चावल्याच कबूल केलं. त्यानंतर नातेवाईक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

ट्रेंडिंग न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार मृत सागर रेणुसे याला काही दिवसांपूर्वी ससून रुग्णालयात दाखल केले होते. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्याचा मंगळवारी मृत्यू झाला आहे. 

सागरचा १५ मार्च रोजी दुचाकीवर जात असताना अपघात झाला होता. त्यांच्या डोक्याला गंभीर मार लावले होते. तेव्हापासून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. त्याच्यावर शस्त्रक्रियाही झाली होती. त्यानंतर त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र दिवसेंदिवस त्याची प्रकृती ढासळत गेली व मंगळवारी त्याची मृत्यूशू झुंज अपयशी ठरली.

WhatsApp channel
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर