मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Leopard in Pune : बाप रे..! पुण्यात महावितरण कार्यालयात शिरला बिबट्या, टेबलाआड लपला अन्.. पाहा धडकी भरवणारा VIDEO

Leopard in Pune : बाप रे..! पुण्यात महावितरण कार्यालयात शिरला बिबट्या, टेबलाआड लपला अन्.. पाहा धडकी भरवणारा VIDEO

Jul 10, 2024 08:43 PM IST

leopard in mahavitaran office : पुण्यातील राजगुरुनगरशहरालगत चांडोली येथील महावितरण कार्यालयातील मीटर टेस्टिंग विभागात हा बिबट्या शिरला.महावितरण कार्यालयात बिबट्या शिरल्याचे पाहूनमहावितरण कर्मचाऱ्यांना घाम फुटला व त्यांची पळता भुई थोडी झाली.

पुण्यात महावितरण कार्यालयात शिरला बिबट्या
पुण्यात महावितरण कार्यालयात शिरला बिबट्या

Leopard in Mahavitaran Office : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्याजवळच्या राजगुरुनगरमधील महावितरणच्या कार्यालयात बिबट्या शिरल्याची घटना समोर आली आहे. राजगुरुनगर शहरालगत चांडोली येथील महावितरण कार्यालयातील मीटर टेस्टिंग विभागात हा बिबट्या शिरला. महावितरण कार्यालयात बिबट्या शिरल्याचे पाहून महावितरण कर्मचाऱ्यांना दरदरुन घाम फुटला व त्यांची पळता भुई थोडी झाली. कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं मात्र घाबरलेल्या कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत बिबट्याला कार्यालयात कोंडलं व वनविभागाला याची माहिती दिली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रणाणावर व्हायरल झाला आहे.

महावितरण कार्यालयात कामकाज सुरू असतानातच बिबट्या कार्यालयात घुसल्याने कर्मचाऱ्यांची धांदल उडाली. कार्यालयातील मीटर टेस्टिंग विभागात महिला कर्मचारी काम करता असताना बिबट्या कार्यालयात घुसला. या महिला कर्मचाऱ्यांनी बिबट्या घुसल्याची माहिती अन्य कर्मचाऱ्यांना देत कार्यालयाचा दरवाजा बंद करून बिबट्याला कोंडलं आणि वनविभागाला कळवलं. बुधवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास बिबट्या कार्यालयात घुसला होता. वन विभागाच्या पथकाने दुपारी २ वाजता त्याला रेस्क्यू केले.

बिबट्याला महावितरण कार्यालयात शिरल्याची बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली व त्याला पाहण्यासाठी बघ्यांची एकच गर्दी कार्यालयाबाहेर झाली होती. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

पुण्यातील खेड, जुन्नर, आंबेगाव, शिरूर या तालुक्यांमध्ये बिबट्याचा मानवी वस्त्यांमध्ये शिरकाव चिंतेचा विषय बनत आहे. राजगुरुनगर जवळ असलेल्या चांडोली परिसरात महावितरणचं कार्यालय आहे. या कार्यालयात आज सकाळच्या सुमारास अडगळीच्या जागेत बिबट्या शिरला. बिबट्या टेबलाच्या आड लपून बसला होता. मागील काही दिवसांपासून एक बिबट्या आपल्या बछड्यांसह या महावितरण कार्यालय परिसरामध्ये फिरत असल्याचे अनेकांनी पाहिलं होतं. मात्र आज (बुधवार) बिबट्या थेट महावितरण कार्यालयामध्येच शिरल्याने एकच खळबळ उडाली.

बिबट्या महावितरण कार्यालयात शिरल्याचे पाहून कर्मचाऱ्यांनी त्याला आतमध्ये कोंडून बाहेर पळ काढला. बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाच्या रेस्क्यू टीमला पाचरण करण्यात आलं. दुपारी २ वाजण्याच्या सुमारास त्याला पकडण्यात आले. सकाळपासूनच हा बिबट्या महावितरण कार्यालयामध्ये ठाण मांडून बसला होता. तोपर्यंत सर्व कर्मचारी काम थांबवून बाहेर उभे होते. बिबट्याला जेरबंद केल्यानंतर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास महावितरण कार्यालयातील कर्मचारी काम करत होते. मात्र बिबट्या कार्यालयात शिरल्याने कर्मचाऱ्यांना घाम फुटला होता. जीव वाचवण्यासाठी त्यांची पळापळ झाली. मात्र बिबट्याला कोंडल्यानं त्याला जेरबंद करता आले. ही घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्यामुळे घटनेची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे.

WhatsApp channel
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर