GBS Outbreak : पुण्यात जीबीएसचा पहिला बळी, ५६ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  GBS Outbreak : पुण्यात जीबीएसचा पहिला बळी, ५६ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

GBS Outbreak : पुण्यात जीबीएसचा पहिला बळी, ५६ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

Jan 29, 2025 10:41 PM IST

Guillain barre syndrome : पुण्यात आज जीबीएसमुळे पहिला बळी गेला असून सिंहगड परिसरात राहणाऱ्या एका महिलेचा मृत्यू झाला आहे. मृत महिला ही कॅन्सरग्रस्त होती व १५जानेवारीपासून तिच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू होते.

पुण्यात जीबीएसचा पहिला बळी
पुण्यात जीबीएसचा पहिला बळी

Guillain Barre Syndrome:  जी बी सिंड्रोमने पुण्यासह राज्यभरात हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. पुण्याबरोबरच नागपूर, सोलापूर, कोल्हापुरातही जीबीएसचे रुग्ण आढळले आहेत. आज पुण्यात जीबीएसचा पहिला बळी गेला आहे. सिंहगड परिसरात एका ५६ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पुण्यात आज (२९ जानेवारी) नवीन १६ जीबीएस रुग्णांची नोंद झाल्याने एकूण रुग्णांची संख्या १२७ वर गेली आहे.

पुणे विभागात जीबीएसचा दुसरा बळी -

पुण्यात आज जीबीएसमुळे पहिला बळी गेला असून सिंहगड परिसरात राहणाऱ्या एका महिलेचा मृत्यू झाला आहे. मृत महिला ही कॅन्सरग्रस्त होती व १५  जानेवारीपासून तिच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. याआधी सोलापूर येथील एकाचा या विषाणूमुळे मृत्यू झाला होता.  पुणे विभागात जीबीएसमुळे झालेला हा दुसरा मृत्यू आहे. पुण्यात सध्या जीबीएसचे १२७ रुग्ण असून त्यांच्यावर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू आहेत. केंद्रीय पथकही पुण्यात दाखल झाले असून संपूर्ण परिस्थितीवर नजर ठेऊन आहे. 

जी बी सिंड्रोममुळे सोलापूरमधील ४० वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला होता. आज पुणे शहरात या आजाराने दुसरा बळी घेतला आहे. जी बी एस रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने पुणे महानगरपालिकेने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. 

गुलेन बॅरी सिंड्रोम हा ऑटोइम्युन आजार असून तो प्रामुख्याने व्हायरल इन्फेक्शननंतर काही आठवड्यांत होतो. मात्र त्यावर उपचार उपलब्ध असल्याने लोकांनी घाबरून जाण्याची गरज नसल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. 

जीबीएस म्हणजे काय? 
सीडीसी (सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन) नुसार, हा एक दुर्मिळ आजार आहे, ज्यामुळे मज्जातंतूंना नुकसान होते. जेव्हा एखाद्या व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती स्वतःच्या नसांना नुकसान पोहोचवते, तेव्हा हा आजार होत असतो.  

लक्षणे काय आहेत?
सीडीसीच्या मते, जीबीएसच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये अशक्तपणा आणि हाता पायांना मुंग्या येणे. जीबीएस ग्रस्त रुग्णांना दोन्ही पायांमध्ये ही लक्षणे जाणवतात. यानंतर, ही लक्षण  हात आणि शरीराच्या वरच्या भागात देखील जाणवू शकतात. जीबीएसमुळे अचानक शरीरात सुन्नपणा येऊन स्नायू कमकुवत होतात. यासोबतच, या आजारात हात आणि पायांमध्ये तीव्र अशक्तपणा येतो.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर