Cylinder blast In Punes Market Yard: पुण्यातील मार्केट यार्ड परिसरातील डॉ. आंबेडकरनगर झोपडपट्टीत शनिवारी (१३ जानेवारी २०२४) दुपारी आग लागली. या आगीची माहिती मिळताच अग्निशम दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. सिलिंडरच्या स्फोटामुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे.
पुण्याच्या मार्केट यार्ड परिसरातील डॉ. आंबेडकरनगर झोपडपट्टीत शनिवारी दुपारी आग लागली. दुपारी चार वाजताच्या सुमारास ही आग लागली. अग्नीशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आली आहे. सिलिंडरच्या स्फोटामुळे ही आग लागल्याचे प्राथमिक माहिती आहे. या झोपडपट्टीतील गल्ली क्रमांक ११ मधील एका झोपडीत सिलिंडरचा स्फोट झाला. सिलिंडरच्या स्फोटामुळे लागलेली आग झपाट्याने पसरली, असे सांगण्यात येत आहे.
डोंबिवलीच्या खोणी येथील टाटा ओरोलिया निवासी इमारतीला आज दीड वाजताच्या सुमारास आग लागली. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्नशमन दलाच्या जवानांना यश आले. या घटनेत कोणतीही जीवितहान झाली नसल्याचे माहिती पलावा अग्निशमन केंद्रातून मिळाली. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. इमारतीच्या सातव्या मजल्यावर आग लागली. त्यानंतर ही आग इतर मजल्यांवर पसरली. सुदैवाने, तिसऱ्या मजल्यापर्यंतच लोक राहत होते.
संबंधित बातम्या