Pune Fire Updates: पुण्यातील धायरी परिसरात आज दुपारी १२ वाजताच्या सुमारास ३ वर्कशॉपला एकाच वेळी आग लागली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या एका गाडीसह एकूण ८ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीवर नियंत्रण मिळण्यात अग्निशमन दलाला यश आले. आज कामगारांना सुट्टी असल्याने मोठी जीवितहानी टळली. ही आग कशामुळे लागली? याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करीत आहेत.
पुण्यातील धायरी परिसरात आज दुपारी १२.१५ वाजता ३ वर्कशॉपला आग लागली. या आगीत एक बॅटरीचा कारखाना, दुसरा मशीनरीचे पार्ट तयार करण्याचा कारखाना आणि तिसरा एक छोटे युनिट जिथे पाणीपुरी संबंधित मटेरियल बनविले जाते, अशा ठिकाणी आग लागली. दुपारी १.३० वाजताच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. आग कशामुळे लागली? हे समजू शकलेले नाही. गणेशोत्सवामुळे वर्कशॉप बंद असल्याने कामगार उपस्थित नसल्याने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर कुरिअर वाहतूक करणाऱ्या वाहनाला आग लागली. आज पहाटे ३.२५ वाजताच्या सुमारास महिंद्रा पिकअपला (एमएच१२ टीव्ही १५०३) आग लागली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. हायवे सेफ्टी पेट्रोलचे सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश भोसले म्हणाले, "मुंबईहून पुण्याकडे आवश्यक कुरिअर मालाची वाहतूक करताना पिकअप वाहनाच्या बोनेटमध्ये आग लागली, ज्यामुळे ही घटना घडली."
संबंधित बातम्या