मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  बापरे..! रील्सच्या नादात काय हा प्रकार; पुण्यात तरुण-तरुणीचा जीवघेणा स्टंट, VIRAL VIDEO पाहून काळजात होईल धस्स

बापरे..! रील्सच्या नादात काय हा प्रकार; पुण्यात तरुण-तरुणीचा जीवघेणा स्टंट, VIRAL VIDEO पाहून काळजात होईल धस्स

Jun 20, 2024 07:40 PM IST

Pune News : व्हायरल व्हिडिओत दिसते की, तरुण उंच इमारतीच्या टेरेसवर झोपला आहे. त्याने त्याचा एक हात टेरेसवरून खाली सोडला असून त्याला पकडून तरुणी लटकत आहे

पुण्यात तरुण-तरुणीचा जीवघेणा स्टंट, VIDEO VIRAL
पुण्यात तरुण-तरुणीचा जीवघेणा स्टंट, VIDEO VIRAL

सध्याच्या काळ सोशल मीडियाचा असून रील बनवण्याच्या नादात तरूणाई आपल्या जीव धोक्यात घालत असल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. रिल बनवण्याचा इतका मोह असतो की, या नादात अनेकांना आपल्या जिवाचीही पर्वा राहात नाही. रिलमधील सर्जनशील कल्पनेचं कौतुक होतं मात्र आता या रिल कलेला विकृत रूप येऊ लागल्याचं दिसत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये रील बनवण्याच्या नादात एका तरुणीचा दरीत कोसळून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता पुण्यातील तरूण-तरूणींच्या जीवघेण्या स्टंटचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. अंगावर काटा आणणारा हा व्हिडिओ नऱ्हे परिसरातील स्वामीनारायण मंदिराजवळचा असल्याचे बोलले जात आहे. इन्स्टाग्रामवर रील (Instagram Reel) बनवण्यासाठी हा स्टंट केल्याचे समोर आले आहे.

 

ट्रेंडिंग न्यूज

रिल्सच्या नावाखाली जीवघेणा स्टंट केल्याचे धक्कादायक प्रकार समोर येऊ लागलेत. मागील आठवड्यात पुण्यातच एक तरुणी हात सोडून दुचाकी चालतावतानाचा व्हिडिओ समोर आला होता. या जीवघेण्या स्टंटचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.त्यानंतर आता तरुण-तरुणीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. तरुणी तरुणाचा हात पकडून लटकताना दिसत आहे. त्यांचा व्हिडिओ शूट करण्यासाठी अन्य दोघे जण तेथे उपस्थित आहेत.

तरुण उंच इमारतीच्या टेरेसवर झोपला आहे. त्याने त्याचा एक हात टेरेसवरून खाली सोडला असून त्याला पकडून तरुणी लटकत आहे. दुसरा तरुण शेजारी उभा राहून व्हिडिओ काढत असल्याचे दिसत आहे. टेरेसवर चारही बाजूने कॅमेरे लावल्याचे दिसत आहे. जर तरुणाला तिचे वजन पेलले नसते तर तरुणी इतक्या उंचीवरून खाली कोसळली असती. परंतु सुदैवाने अशी अप्रिय घटना घडली नाही. मात्र या जीवघेणा स्टंटवरून समाजमाध्यमात मोठ्या प्रमाणावर टीका होऊ लागली आहे.

घटनेचा व्हिडिओ व्हायरल -

तरुण-तरुणीच्या या स्टंटबाजीचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. याचे शुटिंग करण्यासाठी दोन ते तीन कॅमेरामनही तेथे उपस्थित असताना दिसत आहेत. कॅमेरामन वरती थांबून तरुणीच्या या भयंकर स्टंटचा व्हिडिओ शूट करत आहे. त्याचबरोबर इमारतीच्या खालीही कॅमेरे लावले असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ नेमका कधी शूट केला आहे, तसेच यातील तरुण तरुणी कोण आहेत, हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र व्हारल होत असलेल्या व्हिडिओची दखल घेऊन पोलीस काय कारवाई करतात, हे पाहणे उत्सुकतेचे आहे.

WhatsApp channel
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर