मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune News : “तुला राजकीय मस्ती आली का? चुपचाप २५ लाख रुपये दे”, भाजप नेते गणेश बिडकर यांना धमकी

Pune News : “तुला राजकीय मस्ती आली का? चुपचाप २५ लाख रुपये दे”, भाजप नेते गणेश बिडकर यांना धमकी

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 31, 2023 07:27 PM IST

Ganesh Bidkar Extortion Case : भाजपचे नेते,माजी नगरसेवक आणि पदाधिकारी गणेश बिडकर यांनाकॉलकरून तब्बल२५लाख रूपयांच्या खंडणीची मागणीकेली आहे.याप्रकरणी पुण्याच्या सायबरपोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आला.

गणेश बिडकर
गणेश बिडकर

पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या नावाने पुण्यातील एका बिल्डरकडे ३ कोटी रूपयाच्या खंडणीची मागणी करण्यात आली होती. हे प्रकरण ताजे असतानाच आता भाजपचे नेते, माजी नगरसेवक आणि पदाधिकारी गणेश बिडकर यांना कॉल करून तब्बल २५ लाख रूपयांच्या खंडणीची मागणी केली आहे. याप्रकरणी पुण्याच्या सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आला. बिडकर यांना २५ लाखाच्या खंडणीची मागणी करत धमकीचा फोन आल्याने पुण्याच्या राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे.

बिडकर यांना धमकी दिल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिडकर यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, रामनवमीच्या दिवशी एका अज्ञात व्यक्तीने त्यांना व्हॉट्सॲप कॉल करून मराठी आणि हिंदी भाषेत शिवीगाळ केली. "तुला राजकीय मस्ती आली का? चुपचाप पंचवीस लाख रुपये दे" अशी धमकी देत त्यांच्याकडे पैशांची मागणी केली.

 

तसेच, पैसे नाही दिले तर तुझी बदनामी करू, असंही संबंधित अनोळखी व्यक्तीने बिडकर यांना धमकी दिली आहे. गणेश बिडकर देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जातात.

IPL_Entry_Point

विभाग