पुणे महापालिकेने आंबेगाव बुद्रूक येथे १३ बेकायदा इमारतींमधील ५०० फ्लॅटवर बुलडोझर चालवून अतिक्रमण हटवले आहे. यामुळे १३ इमारतींचे बेकायदा बांधकाम सुरू असताना महापालिकेने नोटीस बजावण्याशिवाय कारवाई का केली नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.
पुणे महापालिकेच्या जॉ कटर क्रेनने आंबेगावमध्ये १३ इमारतीमधील ५०० फ्लॅटवर हातोडा चालून अतिक्रमण हटवले गेले. महापालिकेने रात्रीच्या वेळेस ही कारवाई केली. याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. महापालिकेच्या या कारवाईने शेकडो कुंटूबे रस्त्यावर ली आहेत. इमारती बेकायदा असल्याने महापालिकेने ही कारवाई केल्याचं म्हटलं जात आहे. या इमारतींना गेल्या दोन वर्षापासून नोटीसा पाठवण्यात येत होत्या.
महापालिकेच्या बांधकाम विभागाने या इमारतीवर यापूर्वी कोणतीच कारवाई न केल्याने अनेकांनी या इमारतीत फ्लॅट बुक करुन खरेदी केले. त्यांना या इमारतीच्या अवैधपणाबाबत काहीच माहिती नव्हती. आता महापालिकेने कारवाई केल्याने फ्लॅटधारकांचे नुकसान झाले आहे. बिल्डरांनी या इमारती आधीच विकल्याने त्यांचा कोट्यावधी रुपयांचा फायदा झाला आणि सर्वसामान्यांच्या घराच स्वप्न मात्र उध्वस्त झालं. यात बिल्डर आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर मात्र कुठलीच कारवाई होत नाही.
महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनीच अभय दिल्याने एवढ्या मोठ्या बेकायदा इमारती उभ्या राहिल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.