पुणे : तरुणाला घरी बोलावून अल्पवयीन मुलींची दारू पार्टी; नशेत १६ वर्षीय मुलीची आत्महत्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  पुणे : तरुणाला घरी बोलावून अल्पवयीन मुलींची दारू पार्टी; नशेत १६ वर्षीय मुलीची आत्महत्या

पुणे : तरुणाला घरी बोलावून अल्पवयीन मुलींची दारू पार्टी; नशेत १६ वर्षीय मुलीची आत्महत्या

Jul 16, 2024 07:41 PM IST

Pune News : येरवडा भागात एका १६ वर्षीय मुलीने मैत्रिणीसोबत घरी दारूची पार्टी केली. पार्टीनंतर दारूच्या नशेत तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

नशेत १६ वर्षीय मुलीची आत्महत्या (सांकेतिक छायाचित्र)
नशेत १६ वर्षीय मुलीची आत्महत्या (सांकेतिक छायाचित्र)

पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येरवडा भागात एका १६ वर्षीय मुलीने मैत्रिणीसोबत घरी दारूची पार्टी केली. पार्टीनंतर दारूच्या नशेत तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्याचबरोबर आत्महत्या करण्याऱ्या मुलीसोबत असलेली मैत्रिण बेशुद्धावस्थेत सापडली असून तिला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेथे तिच्यावर उपचार सुरू आहेत.

तनिषा शांताराम मनोरे (वय १६) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे.  मृत मुलगी येरवडा येथे रहात होती व ११वी मध्ये शिकत होती. सोमवारी सायंकाळी आई भाजी आणण्यासाठी बाजारात गेल्यानंतर मुलीने मैत्रिणीला घरात बोलावून दारू पार्टी करायचे ठरवले. दोघींनी मद्यप्राशन केले व दारुच्या नशेतच तिने गळफास घेत आपले जीवन संपवले. दुसरी मैत्रिणही अति मद्यप्राशनाने बेशुद्ध होऊन पडली होती. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

मृत तनिषा येरवड्यातील लक्ष्मीनगर भागात रहात होती. ती शहरातील एका महाविद्यालयात अकरावीच्या वर्गात शिकते. तिची आईचा भाजी विक्रीचा व्यवसाय असून ती सोमवारी (१५ जुलै ) सायंकाळी भाजी आणण्यासाठी बाजारात गेली होती. त्यांनी तनीषाच्या दोन मैत्रिणींनी घरी मद्य पार्टी केली. तनिषाच्या मैत्रिणीने परिसरात राहणाऱ्या एका मुलाला फोन करून रात्री आठच्या सुमारास बोलवले होते. या मुलगा घरी आल्यानंतर तनिषाने ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे दिसले. त्याने तिला खाली उतरवले व  चेहऱ्यावर पाणी मारून तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. या मुलानेच तनिषाच्या आईला या घटनेची माहिती दिली व तनिषाला रुग्णालयात दाखल केले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. 

ज्या मुलीने या तरुणाला बोलावले होते ती सुद्धा बेशुद्धावस्थेत सापडली. तिला जागे करण्याचा प्रयत्न केला असता ती सुद्धा नशेत असल्याचे समजले. याची माहिती तिच्या आई-वडिलांना दिल्यानंतर तिला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दारू पार्टीनंतर मुलींनी उलट्या केल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे. तनीषाने आत्महत्या का केली, तसेच तिने कधी गळफास घेतला, याबाबतची माहिती समजू शकली नाही.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर