Pune news : बदल्या जीवन शैलीमुळे मानवाच्या आयुर्मानावर परिणाम झाला आहे. हृदय रोग, मधुमेह हे आजार सामान्य झाले आहेत. मात्र, याचा परिमाण आता लहान मुलांवर देखील होऊ लागला आहे. पुण्यात एका १० वीत शिकणाऱ्या मुलीला शाळेत हृदयविकाराचा झटका आल्याने तिचा शाळेच्या आवारात मृत्यू झाला. या घटनेमुळे मुलीच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. ही घटना कोंढवा येथील एका शाळेत शुक्रवारी घडली.
मान्या पंडित (वय १५) असे हदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. मृतदेहाच्या प्राथमिक तपासणीत मान्याचा मृत्यू हा हदयविकाराच्या झटक्याने झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात अलायी आहे. तिच्या मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात येणार असून याचा अहवालानंतर मृत्युचे खरे कारण कळेल अशी माहिती कोंढवा पोलिसांनी दिली. मान्या ही कोंढवा येथील संस्कृती शाळेत दहावीत शिक्षण घेत होती. शुक्रवारी मान्या शाळेत गेली. सकाळी ७ च्या सुमारास ती बसमधून शाळेच्या पोहोचली.
यावेळी तिसऱ्या मजल्यावर असणाऱ्या तिच्या वर्गात जात असताना ती अचानक खाली कोसळून बेशुद्ध पडली. यावेळी तिच्या सोबत तिच्या मैत्रिणी देखील होत्या. या घटनेमुळे त्या घाबरल्या. याची माहिती त्यांनी शिक्षकांना दिली. शिक्षक व शाळेतील कर्मचाऱ्यांनी मान्याला वानवडी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले होते. मान्याचे पार्थिव शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात असून या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
स्कूल व्हॅनमधून शाळेत मुलींना नेणाऱ्या एका चालकाने शाळेतील मुलीला अश्लील मेसेज पाठवला व तिचा विनय भंग केला. या प्रकरणी व्हॅनचालकाला मनसेच्या कार्यकर्त्यांनी चांगलाच चोप देत पोलिसांकडे दिले. याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेश पाटवळे असे आरोपी व्हॅनचालकाचे नाव आहे. पीडित मुलगी एका शाळेत शिक्षण घेत असून त्याने पाटवळेने मुलीला ‘मला तू आवडते’, असा संदेश पाठविला. ही बाब मुलीच्या पालकांना समजली. त्यानंतर ही बाब मनसे कार्यकर्त्यांना समजल्यावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्याला चोप दिला.